IND vs AUS: Rinku Singh ने आपली फलंदाजीने एकच खळबळ उडवून दिली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या T20 सामन्यामध्ये देखील त्याने अप्रतिम खेळी केली. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या रिंकूने चार चौकार आणि दोन षटकार मारत २९ चेंडूमध्ये 46 धावा केल्या. त्याच्यामध्ये मोठे षटकार मारण्याची क्षमता आहे. त्याने रायपुरमध्ये 100 मीटरचा मॉन्स्टर सिक्स मारला. त्याने 13 व्या ओवरमध्ये मिडविकेटच्या वरून उत्तुंग षटकार मारला. रिंकूने आता स्वतःच या मॉन्स्टर सिक्सचे रहस्य उघड केले आहे.
Rinku Singh ने उघड केले रहस्य
Just Rinku-verse things 😍
— JioCinema (@JioCinema) December 1, 2023
Keep watching the action LIVE on #JioCinema, #Sports18 & #ColorsCineplex 🙌#IDFCFirstBankT20ITrophy #INDvAUS #TeamIndia #JioCinemaSports pic.twitter.com/vfsakRGncp
भारतीय संघाने शुक्रवारी रायपुरमध्ये ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेत सिरीज आपल्या नावावर केली. चौथ्या T20 नंतर, BCCI ने शनिवारी रिंकू आणि जितेश शर्मा यांच्यातील संभाषणाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. संवादादरम्यान जितेशने रिंकू सिंह (Rinku Singh) ला प्रश्न विचारला कि 100 मीटर सिक्स मारण्याचे रहस्य काय आहे? यावर उत्तर देत रिंकू म्हणाला कि, तुला माहिती आहे कि मी तुझ्यासोबत जिम करतो, चांगले अन्न खातो. मला वजन उचलण्याची खूप आवड आहे, त्यामुळे माझ्यात नैसर्गिक शक्ती आहे.
Rinku Singh Networth: गरिबी ते करोडपती बनण्याचा प्रवास, जाणून घ्या T20 चा बादशाह Rinku Singh ची नेटवर्थ
रिंकूने शेयर केला अनुभव
जितेशने जेव्हा रिंकूला विचारले कि, तुला पाहून असे वाटत नाही कि हि तुझी पहिली सिरीज आहे? माझ्यावर तर खूप प्रेशर होता, ज्यावेळी मी फलंदाजीसाठी गेलो होतो. रिंकूने उत्तर दिले कि, मी बराच काळ खेळत आहे. आयपीएलमध्ये देखील चार-पाच वर्षे झाली तर त्यामुळे कॉन्फिडेंस आहे. जितके होईल तितके स्वतःला शांत ठेवतो.
भारताने चौथ्या T20 मध्ये टॉस गमावल्यानंतर 174/9 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाला दिले होते. जितेशने 19 चेंडूमध्ये 1 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 35 धावा केल्या. ऑस्ट्रेलियन संघाला 20 षटकात 7 विकेट गमावून केवळ 154 धावा करता आल्या. भारताने आता हि T20 सिरीज 3-1 ने आपल्या नावावर केली आहे.
Secret behind the giant six 😎
— BCCI (@BCCI) December 2, 2023
Roaring Raipur crowd 🔥
Adding calmness to the partnership 👏
On the mic with Rinku Singh & Jitesh Sharma 👌👌 – By @28anand
Watch the full Video 🎥🔽 #TeamIndia | #INDvAUS https://t.co/lc8Dfk7hI7 pic.twitter.com/RHaXeFnsmP