Animal Box Office Collection Day 9: रणबीर कपूरच्या अ‍ॅनिमल चित्रपटाची 400 करोडच्या दिशेने वाटचाल, 9 व्या दिवशी करू शकते इतकी कमाई

By Viraltm Team

Published on:

Animal Box Office Collection Day 9

Animal Box Office Collection Day 9: रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांचा नुकताच रिलीज झालेला अ‍ॅनिमल चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतो आहे. पहिल्याच दिवसापासून चित्रपटाला दर्शकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने सध्या अनेक रेकॉर्ड मोडीत काढत घसघशीत कमाई केली आहे.

Animal Box Office Collection Day 9

पहिल्या आठवड्यामध्ये चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि चित्रपटाने 300 करोड पेक्षा जास्त कमाई करण्यात यश मिळवले. दुसरा शनिवार देखील संदीप रेड्डी वांगाच्या चित्रपटासाठी आणखीनच धमाकेदार असणार आहे. चित्रपटाने दुसऱ्या शुक्रवारी 23.5 करोडची कमाई केली तर (Animal Box Office Collection Day 9) दुसऱ्या शनिवारी चित्रपट 25 ते 28 करोडची कमाई करू शकतो. ज्यामुळे चित्रपटाचे कलेक्शन एकूण 370 करोडच्या पुढे जाऊ शकते.

Animal Box Office Collection Day 9

Animal Box Office Collection Day 9

ताज्या अहवालानुसार चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मजबूत पकड बनवली आहे, रणबीर कपूरचा चित्रपट दुसऱ्या विकेंडला 400 करोडचा टप्पा पार करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दिवसभरामध्ये हि संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. आता दुसऱ्या विकेंडमध्ये चित्रपट किती टप्पा गाठेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

विशेष म्हणजे बॉक्स ऑफिसवर अ‍ॅनिमल चित्रपटाची टक्कर विक्की कौशलच्या सॅम बहादूर चित्रपटासोबत आहे. पण अ‍ॅनिमलने सॅम बहादूरला मागे टाकण्यात यश मिळवले आहे. दरम्यान विक्कीने एका मुलाखतीमध्ये बोलताना म्हंटले कि जेव्हा दोन फलंदाज सलामीसाठी क्रीजवर येतात तेव्हा असे म्हणून शकत नाही कि दोघे एकमेकांसोबत भिडत आहेत, तर ते एकाच संघासाठी खेळत आहेत. त्याचप्रमाणे आम्ही हिन्दी चित्रपटासाठी एकत्र खेळत आहोत.

Animal Box Office Collection Day 9

आठव्या दिवशी मोडला पठान-जवान, गदर 2 सहित या चित्रपटांचा रेकॉर्ड

अ‍ॅनिमलने आठव्या दिवशी देखील जबरदस्त कलेक्शन केले. यासोबतच पुन्हा एकदा चित्रपटाने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांना धूळ चारली. अ‍ॅनिमलने रिलीजच्या आठव्या दिवशी 20 करोडपेक्षा जास्त कमाई करून शाहरुख खानच्या पठान आणि जवान सोबत सनी देओलच्या गदर 2 आठव्या दिवसाच्या कलेक्शनचा रेकॉर्ड ब्रेक केला. यासोबतच चित्रपट आठव्या दिवशी हाय कलेक्शन करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. अ‍ॅनिमल चित्रपटामध्ये रणबीर कपूर शिवाय रश्मिका मंदाना, बॉबी देओल आणि अनिल कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Leave a Comment