Masterchef India 2023: मास्टरशेफ इंडिया 2023 चे नुकतेच समापन झाले आहे आणि शोचा विजेता मिळाला आहे. गेल्या दिवशी शोचा ग्रँड फिनाले होता. 8 आठवडे चाललेल्या या शो दरम्यान कंटेस्टंट आव्हानांनुसार स्वादिष्ट पदार्थ बनवताना पाहायला मिळाले. प्रत्येक खडतर आव्हाने पार करत मोहम्मद आशिक शोचा विजेता ठरला. शोचे जजेस विकास खन्ना, रणवीर बराड़ आणि पूजा ढींगरा यांनी मोहम्मद आशिकला विजेता म्हणून घोषित केले. शोच्या कंटेस्टंटना रोमांचक स्पर्धांमध्ये या जजेसकडून मार्गदर्शन मिळत राहिले.
Masterchef India 2023 – घरी घेऊन गेला मोठी रक्कम
24 वर्षाचा कंटेस्टंट मोहम्मद आशिकने मास्टरशेफ इंडियाचा 8 वा सीजन (Masterchef India 2023) जिंकून मोठी कामगिरी केली. त्याने एक कोट, ट्रॉफी आणि 25 लाख रुपयांची रक्कम आपल्या नावावर केली. रुखसार सईद आणि नंबी जेसिका देखील फिनालेचा हिस्सा राहिले. नंबी जेसिकाला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले, तर रुखसार सईद तिसऱ्या स्थानावर राहिला. सूरज थापा देखील फिनालेचा हिस्सा बनला होता.
रणवीर बरारने दिल्या शुभेच्छा
जज रणवीर बरारने सोशल मिडियाच्या माध्यमातून मोहम्मद आशिकला शुभेच्छा दिल्या. त्यांनी लिहिले कि, प्रेरणादायक सुरुवातीपासून ते आव्हानात्मक प्रवासापर्यंत, तुम्ही कधीही धाडस सोडले नाही. मास्टरशेफ (Masterchef India 2023 winner) झाल्याबद्दल मोहम्मद आशिकचे अभिनंदन!
From an inspirational start to a challenging journey, you never stopped daring for more.
— Ranveer Brar (@ranveerbrar) December 8, 2023
Congratulations on becoming the MasterChef Mohd. Ashiq!
.
.
.#winner #masterchefindia pic.twitter.com/nbkKQswvv3
मोहम्मद आशिकच्या प्रतिक्रिया
विजेता बनल्यानंतर मोहम्मद आशिकने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्याने म्हंटले कि मी मास्टरशेफ इंडियामधील तुफानी प्रवासासाठी खूपच आभारी आहे. एलिमिनेशनचा सामना करण्यापासून ते ट्रॉफी मिळवण्यापर्यंत प्रत्येक क्षण आव्हानात्मक होता. या अनुभवाने माझे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले आहे.
कोण आहे मोहम्मद आशिक?
मोहम्मद आशिक हा मुळचा मंगळूर, कर्नाटकचा आहे. ज्यावेळी ज्या वेळी आशिकने मास्टरशेफ इंडिया स्पर्धेत भाग घेतला तेव्हा तो त्याच्या गावात कुलुक्की हब नावाच्या ठिकाणी ज्यूसचे दुकान चालवत होता. स्वयंपाकाची आवड आणि वेगळ्या प्रकारे भोजन बनवण्याचे कौशल्य दोन्हींची सांगड घालून मोहम्मद आपल्या कुटुंबाला आर्थिक रूपाने मदत करण्यास सक्षम झाला आहे.