IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS:) दरम्यान पाच T20 सामन्यांची सिरीज खेळली जात आहे. सिरीजमध्ये आतापर्यंत टीन सामने झाले आहेत, ज्यामध्ये भारतीय टीमने दोन तर ऑस्ट्रेलियाने एक सामना जिंकला आहे. चौथा सामना दोन्ही संघांसाठी खूपच महत्वाचा आहे. आतापर्यंत दोन सामने जिंकलेली टीम इंडिया चौथा सामना जिंकून सिरीज आपल्या नावावर करण्याच्या तयारीत आहे तर ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकून सिरीजमध्ये बरोबरी करण्याच्या प्रयत्न करेल. चौथा सामना 1 डिसेंबर रोजी शुक्रवारी शहीद वीर सिंह नारायण स्टेडियम रायपुर येथे खेळवला जाणार आहे.
IND vs AUS: अशी असू शकते सलामीची जोडी
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) दरम्यान चौथ्या T20 सामन्यासाठी भारतीय टीमकडून ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वालची जोडी पुन्हा एकदा सलामीला पाहायला मिळू शकते. दोघेही उत्कृष्ट फलंदाजी करत आहेत. तिसऱ्या सामन्यामध्ये ऋतुराज गायकवाडने ५७ चेंडूमध्ये १२३ धावांची जबरदस्त खेळी केली होती. तर दुसऱ्या सामन्यामध्ये यशस्वी जयस्वालने ५३ धावांची खेळी केली होती. अशामध्ये कर्णधार कोणताही बदल करेल असे वाटत नाही.
मधल्या फळीत होऊ शकतो बदल
तिसऱ्या क्रमांकावर ईशान किशनला संधी मिळू शकते तर सुर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर येऊ शकतो. आतापर्यंत दोघेही या सिरीजमध्ये घटक फलंदाजी करताना दिसले आहेत. पहिल्या तीन सामन्यांमध्ये श्रेयस अय्यरला संघात स्थान देण्यात आले नव्हते. आता तो चौथ्या सामन्यासाठी संघामध्ये सामील झाला आहे. त्याला तिलक वर्माच्या ठिकाणी संधी दिली जाऊ शकते. पाचव्या क्रमाकांवर रिकू सिंह आपली कमाल दाखवू शकतो.
असा असू शकतो गोलंदाजी विभाग
चौथ्या सामन्यामध्ये अक्षर पटेल फिरकीची धुरा सांभाळेल. तर रवी बिश्नोई त्याला साथ देईल. गेल्या सामन्यामध्ये त्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. त्याने 4 ओवरमध्ये फक्त ३२ धावा देऊन २ विकेट घेतल्या होत्या. याशिवाय प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह आणि आवेश खान वेगवान गोलंदाजीचा मारा करतील. तथापि गेल्या सामन्यामध्ये कृष्णा चांगलाच महागात पडला होता, पण त्याच्याशिवाय वेगवान गोलंदाजीसाठी संघाकडे दुसरा पर्याय नाही.