Rahul Dravid ला किती मिळणार सॅलरी, टीम इंडियाच्या हेड कोचचा किती असेल कार्यकाळ?

By Viraltm Team

Published on:

Rahul Dravid

Rahul Dravid: बीसीसीआईने वनडे वर्ल्डकप फायनलिस्ट राहिलेल्या भारतीय टीमचा फॉर्म कायम राखण्यासाठी राहुल द्रविडचे हेड कोच पद कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आता भारतीय संघाचे पुढचे लक्ष 2024 मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपवर कब्जा करण्याचे असेल. राहुल द्रविडचा कार्यकाळ किती असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पुढील वर्षी जून-जुलैमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपपर्यंत ते पदावर राहणार असल्याचे समजते. भारतीय क्रिकेट बोर्डाने एका निवेदनामध्ये म्हंटले आहे कि, मुख्य कोच राहुल द्रविड आणि टीम इंडिया (सीनियर पुरूष) सपोर्ट स्टाफच्या करारामध्ये विस्तार केला आहे. वर्ल्डकपनंतर कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर बोर्डाने द्रविडसोबत चर्चा केली आणि त्याचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

Rahul Dravid ची सॅलरी किती असेल?

बीसीसीआई (BCCI) सचिव जय शाह म्हणाले कि द्रविडला आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी बोर्डाचा पूर्ण पाठिंबा असेल. भारतीय संघाला गेल्या दशकभरात आयसीसीचे एकही विजेतेपद जिंकता आलेले नाही. हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) ला त्याच्या शेवटच्या कार्यकाळात फी म्हणून वर्षाला सुमारे 10 कोटी रुपये मिळत होते. वर्ल्डकप संपताच द्रविडचा करार देखील संपला. त्यानंतर तो आयपीएलच्या कोणत्याही संघामध्ये सहभागी होऊ शकतो अशी बातमी समोर आली. अवघ्या दोन महिन्याच्या कार्यकाळामध्ये त्याला करोडो रुपये कमवण्याची संधी होती. आता द्रविडने टीम इंडियासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मागील कार्यकाळापेक्षा त्याला जास्त सॅलरी ऑफर केली जाऊ शकते. मात्र अधिकृतपणे याला दुजोरा मिळालेला नाही.

Rahul Dravid च्या करियरवर एक नजर

राहुल द्रविड (Rahul Dravid) ने टी-20 वर्ल्डकप 2021 नंतर रवी शास्त्रीची जागा घेतली होती, त्याचा दोन वर्षाचा कार्यकाळ वर्ल्डकपनंतर संपुष्टात आला. द्रविड कोच असताना भारता गेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये उपविजेता ठरला होता. राहुल द्रविडच्या क्रिकेट करियरबद्दल बोलायचे झाले तर त्याने १६४ टेस्ट सामन्यांच्या 286 डावांमध्ये 36 शतके आणि 63 अर्धशतकांच्या मदतीने 13288 धावा केल्या आहेत, तर 270 हि त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. ‘द वॉल’ या नावाने ओळख असलेल्या बेंगळुरूच्या या फलंदाजाने भारतासाठी 344 एकदिवसीय सामन्यांमध्ये 12 शतके आणि 83 अर्धशतकांच्या मदतीने 10889 धावा केल्या आहेत.

Leave a Comment