Deepak Chahar: धक्कादायक ! दीपक चहरच्या वडिलांना ब्रेन स्ट्रोक, प्रकृती गंभीर, म्हणाला; वडिलांची सेवा…

By Viraltm Team

Published on:

Deepak Chahar

Deepak Chahar Health Update on Father: टीम इंडियाचा क्रिकेटर दीपक चहरने त्याच्या वडिलांच्या हेल्थबद्दल मोठी अपडेट दिली आहे. नुकतेच त्याचे वडील लोकेंद्र चहर यांना ब्रेन स्ट्रोकमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दीपक चहर ऑस्ट्रेलिया आणि भारत दरम्यान झालेल्या T20 सिरीजच्या शेवटच्या सामन्यापूर्वी घरी परतला होता. त्याला वडिलांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळाली, ज्यानंतर तो बेंगलोरहून थेट अलीगडला रवाना झाला होता.

Deepak Chahar ने वडिलांबद्दल दिली हेल्थ अपडेट

दीपक चहर (Deepak Chahar) चे वडील लोकेंद्र चहर यांच्याबद्दल हेल्थ अपडेट दिली. त्याने सांगितले कि त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा हॉट आहे. दीपकने हे देखील सांगितले कि त्याचे वडील त्याच्यासाठी सर्वकाही आहेत. यामुळे सिलेक्टर आणि हेड कोच राहुल द्रविड यांना सर्व माहिती दिली आहे. दीपकने सांगितले कि जोपर्यंत वडिलांची प्रकृती पूर्णपणे बरी हॉट नाही तोपर्यंत तो त्यांच्यासोबत राहणार आहे आणि त्यांचे सेवा करणार आहे.

Deepak Chahar

SA दौऱ्यावर जाण्याबाबत सांगितले

दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत दीपक चहर म्हणाला कि, हे पूर्णपणे त्याच्या वडिलांच्या प्रकृतीवर अवलंबून आहे. वडिलांची प्रकृती पूर्णपणे सुधारल्यानंतरच पुढील रणनीती बनविण्याबाबत तो म्हणाला. आपण संघ व्यवस्थापनाच्या सतत संपर्कामध्ये असल्याचे देखील तो म्हणाला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20 सिरीजमध्ये दीपकला फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. रायपुर येथे झालेल्या T20 सामन्यात त्याने दोन विकेट्स घेतल्या. आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी तो T20 आणि ODI संधाचा भाग आहे.

T20 सामन्यांसाठी भारतीय संघ: यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.

ODI सामन्यांसाठी भारतीय संघ: ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चहर.

INDW vs ENGW: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी आणि T20 सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा, या खेळाडूंना मिळाली संधी

Leave a Comment