Rinku Singh Networth: गरिबी ते करोडपती बनण्याचा प्रवास, जाणून घ्या T20 चा बादशाह Rinku Singh ची नेटवर्थ

By Viraltm Team

Published on:

Rinku Singh

Rinku singh Networth: T20 क्रिकेटचा नवा हिरो रिंकू सिंह सध्या चर्चेमध्ये आहे. जेव्हापासून त्याने IPL 2023 मध्ये 5 षटकार मारले तेव्हापासून त्याची चांगलीच हवा झाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या T20 सामन्यांमध्ये रिंकूने तुफानी फलंदाजी केली आहे. T20 क्रिकेटमध्ये तो भारतीय संघाचा नवा फिनिशर बनला आहे. IPL नंतर आता निळ्या जर्सीमध्ये देखील तो आपल्या बॅट कमाल दाखवत आहे. रिंकू सिंह (Rinku Singh) ने आपल्या आयुष्यामध्ये खूपच गरिबी पहिली आहे. पण IPL ने त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले आहे. आता तो भारतीय टीम साठी खेळून करोडो रुपये कमवत आहे. चला तर जाणून घेऊया त्याची नेटवर्थ किती आहे.

Rinku Singh ने लहानपणी गरिबीत काढले दिवस

Rinku Singh

T20 चा नवा बादशाह Rinku Singh ने लहानपणी खूपच हलाखीचे दिवस काढले. रिंकू सफाई कामगार म्हणून काम करायचा. त्याने सिलिंडर डिलिवरी देखील केली. पैसे कमवण्यासाठी त्याने फ्लोर देखील साफ केले. पण एक दिवस त्याचे नशीब पालटले आणि तो आता करोडोमध्ये खेळत आहे.

KKR कडून खेळण्यासाठी Rinku Singh ला किती पैसे मिळतात

KKR म्हणजेच Kolkata Knight Riders रिंकू सिंगला फक्त एक सामना खेळण्यासाठी 4.23 लाख रुपये देते. रिंकू KKR साठी मधल्या फळीमध्ये खेळतो. त्याने फिनिशर म्हणून KKR साठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

अलीगडमध्ये घेतले आहे आलिशान घर

Rinku Singh

माहितीनुसार रिंकू सिंह ने अलीगडच्या ओजोन सिटी मध्ये 200-200 यार्डचे दोन प्लॉट खरेदी केले आहेत. तो लवकरच आपल्या नवीन घरामध्ये शिफ्ट होणार आहे.

किती आहे Rinku Singh ची नेटवर्थ

रिंकू सिंह चे ६० ते ७० लाख रुपये वार्षिक उत्पन्न आहे आणि त्याची नेटवर्थ 6.12 करोड रुपये इतकी आहे. तो आता जाहिरातींमधून देखील पैसे कमवत आहे.

Leave a Comment