INDW vs ENGW: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी आणि T20 सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा, या खेळाडूंना मिळाली संधी

By Viraltm Team

Published on:

INDW vs ENGW

INDW vs ENGW: भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्ध T20 आणि टेस्ट सिरीज खेळणार आहे. दोन्ही संघांमध्ये २ टेस्ट सामन्यांची सिरीज खेळवली जाणार आहे. या सिरीजसाठी BCCI ने भारतीय महिला संघांची निवड करण्यात आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या सिरीजसाठी हरमनप्रीत कौर संघाचे नेतृत्व करणार आहे, तर स्मृती मानधना मंधाना उपकर्णधाराची धुरा सांभाळणार आहे.

INDW vs ENGW सिरीजसाठी भारतीय संघ

T20 संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), रिचा घोष, अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका ठाकूर, टी. पूजा वस्त्राकर, कनिका आहुजा आणि मिनू मणी.

टेस्ट संघ: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीसाठी भारताचा संघ: हरमनप्रीत कौर (सी), स्मृती मानधना (व्हीसी), जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), रिचा घोष (विकेटकीपर), स्नेह राणा, शुभा सतीश, हरलीन देओल , सायका इशाक, रेणुका सिंग ठाकूर, तीतस साधू, मेघना सिंग, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राकर.

Rinku Singh Networth: गरिबी ते करोडपती बनण्याचा प्रवास, जाणून घ्या T20 चा बादशाह Rinku Singh ची नेटवर्थ

INDW vs ENGW सिरीजचे शेड्यूल

भारत आणि इंग्लंड दरम्यान (INDW vs ENGW) 3 T20 सामन्यांची सिरीज खेळवली जाईल. या सिरीजचा पहिला सामना 6 डिसेंबर रोजी खेळवला जाईल. यानंतर सिरीजचे दोन सामने 9 डिसेंबर आणि 10 डिसेंबर रोजी खेळवले जातील. T20 सिरीजनंतर भारत आणि इंग्लंड दरम्यान 2 टेस्ट सामन्यांची सिरीज खेळवली जाईल. या सिरीजची पहिली टेस्ट 14 डिसेंबर आणि दुसरी टेस्ट 21 डिसेंबर रोजी खेळवली जाईल.

INDW vs ENGW

यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार भारतीय महिला संघ

इंग्लंडविरुद्धच्या सिरीजनंतर भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट आणि वनडे सामन्यांची सिरीज खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान ३ वनडे सामन्यांची सिरीज खेळवली जाणार आहे. वनडे सिरीजमधील पहिला सामना 28 डिसेंबर रोजी होणार आहे. तर दुसरा सामना 30 डिसेंबर आणि तिसरी सामना 2 जानेवारी रोजी होणार आहे. मात्र या सिरीजसाठी अजून भारतीय महिला संघाची निवड करण्यात आलेली नाही.

Leave a Comment