गेल्या काही वर्षांमध्ये महिला क्रिकेपटूंनी क्रिकेट विश्वामध्ये मोठा दबदबा निर्माण केला आहे. अशा अनेक दिग्गज महिला क्रिकेटर्स आहेत ज्यांनी अनेक कीर्तिमान स्थापित केले आहेत. सध्या महिला क्रिकेटची क्रेज देखील झपाट्याने वाढत आहे. आज अशा काही महिला क्रिकेटर्सबद्दल जाणून घेणार आहोत ज्या त्यांच्या खेळाबरोबरच सुंदर दिसण्यासाठी देखील प्रसिद्ध आहेत.
आयर्लंड क्रिकेट संघाची महिला स्टार खेळाडू इसाबेल जॉयस हि सुंदर महिला क्रिकेटपटूंपैकी एक मानली जाते. इसाबेल ऑलराउंडर असून तिने १९९९ मध्ये भारताविरुद्धच्या सामन्यामध्ये क्रिकेट विश्वामध्ये पदार्पण केले होते. ती उजव्या हाताने बॅटिंग करते तर डाव्या हाताने बॉलिंग करते.
ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटर एलिस पेरी जगातील प्रसिद्ध ऑलराउंडर्सपैकी एक आहे. एलिस पेरीचा नंबर देखील जगातील सर्वात सुंदर खेळाडूंच्या यादीमध्ये लागतो. एलिस पेरी तिच्या फिटनेसमुळे देखील खूप ओळखली जाते. एलिस पेरीच्या खेळाचे जगभरामध्ये चाहते आहेत.
पाकिस्तान क्रिकेट संघाची माजी कप्तान राहिलेली सना मीर देखील खूपच सुंदर आणि ग्लॅमरस आहे. सणाच्या सौंदर्याचे देखील खूप चाहते आहेत. PCB महिला क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार मिळवणारी ती पाकिस्तानची पहिली महिला क्रिकेटर ठरली आहे. सनाला हा पुरस्कार २०१३ मध्ये देण्यात आला होता.
महिला क्रिकेट टीमचा भाग असलेली हरलीन देओलदेखील स्टार खेळाडूंपैकी एक आहे. सौंदर्याच्या बाबतीत हरलीन बॉलीवूड अभिनेत्रीला देखील टक्कर देते. तिच्या बॅटिंगचे सर्वच चाहते आहेत. हरलीनचा ड्रेसिंग सेन्स देखील कमालीचा असतो.
पाकिस्तान संघाची माजी वेगवान गोलंदाज कैनात इम्तियाजचे करियर तितके प्रभावी ठरले नाही. पण सौंदर्याच्या बाबतीत तिला तोड नाही. अधून मधून तिचे फोटो सोशल मिडिया वर शेयर होत असतात. कैनात दिसण्यात देखील खूप स्मार्ट आहे.
जगातील टॉप ५ सुंदर महिला क्रिकेटर्स, ज्यांच्यासमोर दिग्गज अभिनेत्रीदेखील आहेत फिक्क्या…
By Viraltm Team
Published on: