Rajal Arora: भारतीय टीमचे 20 सदस्य बुधवारी दक्षिण आफ्रिकेला बेंगलोरहून रवाना झाले आहेत. यादरम्यान टीम इंडियाचा फिनिशर रिंकू सिंहने त्याच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरून एक फोरो शेयर केला आहे ज्यामध्ये टीम इंडियाचे काही T20 खेळाडू दिसत आहेत. या फोटोत एक मुलगी देखील पाहायला मिळत आहे, जिची सध्या सोशल मिडियावर खूपच चर्चा हॉट आहे. आता लोकांना हा प्रश्न पडला आहे कि हि मुलगी आहे तरी कोण?
Rajal Arora – मिस्ट्री गर्लचा फोटो व्हायरल
वास्तविक रिंकू सिंहने इंस्टाग्राम अकाऊंटवरून जो फोटो शेयर केला आहे त्यामध्ये कुलदीप यादव, तिलक वर्मा, अर्शदीप सिंह पाहायला मिळत आहेत. त्यांच्या ठीक मागे एक मुलगी पाहायला मिळत आहे. तथापि ती दुसरी कोणी नसून टीम इंडियाच्या बॅकरूम स्टाफमधील एकमेव फिमेल प्रोफेशनल राजलक्ष्मी अरोरा आहे. ती अनेक वर्षांपासून टीम इंडियासोबत ट्रॅव्हल करताना पाहायला मिळते. तिचे निकनेम Rajal Arora आहे.
कोण आहे मिस्ट्री गर्ल
राजलक्ष्मीने प्रोफेशनल करियरची सुरुवात एक कंटेंट रायटर म्हणून केली होती. 2015 मध्ये ती BCCI मध्ये सोशल मिडिया मॅनेजर म्हणून सामील झाली. आता ती BCCI मध्ये सिनियर प्रोड्युसर आहे. राजलक्ष्मीने सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशनमधून पुणे येतून शिक्षण घेतले आहे. तिने मिडियाची डिग्री मिळवली आहे. तिने रिव्हरडेल हायस्कूलमधून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. शालेय जीवनामध्ये ती बास्केटबॉल आणि नेमबाजी संघाचा भाग देखील होती.
गरिबी ते करोडपती बनण्याचा प्रवास, जाणून घ्या T20 चा बादशाह Rinku Singh ची नेटवर्थ
2019 मध्ये राजलक्ष्मीला BCCI च्या चार सदस्यीय अंतर्गत समितीची प्रमुख म्हणून नॉमिनेट केले गेले होते. तेव्हापासून ती बोर्डासोबत जोडली गेली आहे. तिने यापूर्वी मंडळाच्या तक्रार समितीचे प्रमुखपद देखील भूषवले आहे. यादरम्यान तिने भारतीय प्लेयर्स विरुद्ध गैरवर्तन आणि भारतीय खेळाडूंच्या वर्तनावर देखील लक्ष ठेवले होते.
तथापि आता तिला सिनियर मिडिया प्रोड्युसर बनवण्यात आले आहे. याशिवाय ती आयपीएलच्या अनेक सीझनमध्ये मीडिया मॅनेजर म्हणूनही दिसली आहे. टीम इंडिया 10 डिसेंबर रोजी T20 सिरीजमधील पहिला सामना खेळणार आहे. सूर्याला T20 चा कर्णधार बनवण्यात आले आहे. सूर्याच्या नेतृत्वाखाली भारताने नुकतेच घरच्या मैदानावर 5 सामन्यांच्या T20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 4-1 ने पराभव केला. अशा परिस्थितीत भारतीय युवा खेळाडूंचे मनोबल उंचावलेले आहे.