भारतीय क्रिकेट टीमचा वेगवान गोलंदाज उमेश यादव सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतो. तथापि काही काळापासून तो टीमच्या बाहेर आहे. यादरम्यान अनेक धार्मिक स्थळांवर तो नेहमी पाहायला मिळत असतो. धार्मिक कार्यांमध्ये विशेष त्याला विशेष रुची आहे. याशिवाय तो अनेक सण अगदी साधेपणाने साजरे करतो.
भारतीय क्रिकेटर उमेश यादवची पत्नी तान्या वाधवा एक पंजाबी कुटुंबातून आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार कोलकाता नाइट राइडर्सचा खेळाडू उमेश २०१० मध्ये एका आयपीएल मॅचदरम्यान तान्या वाधवाला पहिल्यांदा भेटला होता.
तान्या क्रिकेटची मोठी फॅन आहे आणि तिला उमेशला भेटण्याची संधी एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून मिळाली. इथूनच दोघांमध्ये जवळीक वाढली आणि दोघे चांगले मित्र झाले. ज्यानंतर ते एकमेकांना डेट करू लागले. या दोघांच्या नात्याची सुरुवात इथूनच झाल्याने मानले जाते.
२९ मे २०१३ रोजी उमेश यादवने त्याची गर्लफ्रैंड तान्या वाधवासोबत हॉटेल सेंटर पॉइंट नागपूर येथे लग्न केले होते. उमेश यादवची पत्नी तान्या वाधवा हिला लहानपणापासूनच फॅशन डिझायनर बनायचे होते. दिल्लीत शिक्षण पूर्ण केल्यानंतर तान्याने फॅशनला करिअर म्हणून निवडले.