सूर्यकुमार यादवने पत्नी देविशासोबत घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन, पहा फोटोज…

By Viraltm Team

Published on:

भारतीय क्रिकेट संघ सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळत आहे. या मालिकेत टीम इंडियाने सलग दोन सामने जिंकून विरोधी संघावर २-० अशी मजबूत आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा सामना १ मार्चपासून इंदोरमध्ये खेळवला जाणार आहे. इंदोर कसोटीपूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघाला शॉर्ट ब्रेक मिळाला.

टीम इंडियाच्या खेळाडूंनि या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. टीम इंडियाचे खेळाडू फिरताना आणि विश्रांती घेताना दिसत आहेत. भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमारने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्येच कसोटी पदार्पण केले. तो आता भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळलेल्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे.

तिसऱ्या टेस्टपूर्वी सूर्यकुमार यादव आपल्या पत्नीसोबत तिरुपती मंदिराला भेट देताना पाहायला मिळाला. त्यांनी दर्शनानंतरचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहेत. सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

सूर्यकुमार यादव पत्नी देविशा शेट्टीसोबत तिरुपती मंदिरात जात असल्याचे फोटोंमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. मंदिरातून बाहेर आल्यानंतर दोघांचे फोटो क्लिक करण्यात आली आहेत. सूर्यकुमार यादव फिकट गुलाबी रंगाच्या कुर्त्यामध्ये पाहायला मिळाला तर त्याच्या पत्नीने लाल रंगाच्या सूटमध्ये पाहायला मिळाली. त्यांचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत.

सूर्यकुमार यादवचे कसोटी पदार्पण इतके चांगले झाले नाही. त्याने पदार्पणाच्या सामन्यात केवळ ८ धावा बनवल्या. सूर्याला नागपूर कसोटीत संधी देण्यात आली होती पण दिल्ली कसोटीत त्याला बाकावर बसवण्यात आले आणि त्याच्या जागी श्रेयस अय्यरचा समावेश करण्यात आला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर दोन्ही संघ ३ वनडे सामन्यांची मालिका देखील खेळणार आहेत. सूर्याला वनडे मालिकेतही टीम इंडिया सहभागी करण्यात आले आहे. सूर्याने टीम इंडियासाठी आतापर्यंत एकूण २० एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या १८ डावांमध्ये त्याने २८.८६ च्या सरासरीने ४३३ धावा केल्या आहेत.

Leave a Comment