टीम इंडियाचा ‘लॉर्ड’ शार्दुल ठाकूरने मिताली परुलकरसोबत केले लग्न, समोर आले फोटो…

By Viraltm Team

Published on:

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर शार्दुल ठाकूरने त्याची गर्लफ्रेंड मिताली पारुलकरसोबत लग्न केले आहे. दोघांनी सोमवारी मुंबईमध्ये मराठी रितीरिवाजातून सात फेरे घेतले. केएल राहुल आणि अक्षर पटेल नंतर या वर्षी लग्न करणारा शार्दुल ठाकूर हा तिसरा भारतीय क्रिकेटपटू आहे. शार्दुल ठाकूर आणि मिताली परुलकर यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.

शार्दुल-मितालीचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. लग्नापूर्वी संगीत सेरेमनी आणि हळदी सेरेमनी आयोजित करण्यात आली होती. याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, श्रेयस अय्यर यांनीदेखील लग्नामध्ये हजेरी लावली होती. इतकेच नाही तर युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा, अभिषेक नायर आणि मुंबई संघाचा स्थानिक सिद्धेश लाड देखील पाहायला मिळाले.

रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेह देखील संगीत सेरेमनीमध्ये सहभागी झाले होते. तर श्रेयस अय्यर आणि युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा हळदी सेरेमनीमध्ये सहभागी झाली होती. शार्दुल ठाकूर आणि मिताली परुलकर यांनी संगीत सेरेमनीच्या आधी एक पूल पार्टी देखील आयोजित केली होती, ज्यामध्ये दोघांनी त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत मस्ती केली.

शार्दुल ठाकूर आणि मिताली परुलकर यांची नोव्हेंबर २०२१ मध्ये एंगेजमेंट झाली होती. रोहित शर्मा आणि मालती चहर देखील फंक्शनमध्ये सहभागी झाले होते. बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी हे नाते पुढे नेण्याचा निर्णय घेतला होता. शार्दुल ठाकूरची पत्नी बिजनेस वूमन आहे आणि ती एक स्टार्टअप कंपनी चालवते.

३१ वर्षीय शार्दुल ठाकूरने आतापर्यंत भारतासाठी आठ कसोटी, ३४ एकदिवसीय आणि २५टी-२० सामने खेळले आहेत. शार्दुलने कसोटीत २७, एकदिवसीय सामन्यात ५० आणि टी-२०मध्ये ३३ विकेट घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी शार्दुलचा संघात समावेश करण्यात आला होता. शार्दुल आयपीएल २०२३ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स खेळताना पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shardul Thakur (@shardul_thakur)

Leave a Comment