भारताचा स्टार क्रिकेटर शार्दुल ठाकूर नुकताच त्याची गर्लफ्रेंड मिताली पारुलकरसोबत विवाह बंधनात अडकला आहे. शार्दुल आणि मितालीने २७ फेब्रुवारी रोजी मुंबईमध्ये लग्न केले. दोघेहि मराठी रीतीरिवाजानुसार विवाह बंधनात अडकले. शार्दुल आणि मितालीचे फोटो सोशल मिडियावर अजून देखील व्हायरल होत आहेत.
शार्दुलच्या लग्नाच्या फोटोंसोबत लग्नाचे आणि हळदीचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. आता शार्दुलचा आणखी एक व्हिडीओ सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहेत. मिताली पारुलकरबरोबर लगीनगाठ बांधल्यानंतर आपल्या हटके स्टाईलमध्ये मिताली साठी उखाणा घेतला. याचा व्हिडीओ भास्कर घाणेकर या ट्वीटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. “बॉलिंग टाकतो क्विक, रन पण धावतो क्विक…मिताली आमची सुंदरतेचं प्रतीक” उखाणा शार्दुलने असा हटके स्टाईलमध्ये मितालीसाठी घेतला.
शार्दुल-मितालीने २०१९ मध्ये एंगेजमेंट केली होती. ज्यामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंनी हजेरी लावली होती. रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, युजवेंद्र चहल, अभिषेक नायर आणि मुंबई संघाचा स्थानिक क्रिकेटर सिद्धेश लाडदेखील यादरम्यान उपस्थित होते. तर लग्नापूर्वी संगीत सेरेमनी देखील आयोजित करण्यात आली होती.
केएल राहुल आणि अक्षर पटेल यांच्यानंतर लग्न करणारा शार्दुल ठाकूर तिसरे क्रिकेटर बनला आहे. ३१ वर्षीय शार्दुलने आतापर्यंत भारतासाठी आठ कसोटी, ३४ एकदिवसीय आणि २५ टी-२० सामने खेळले आहेत. तर कसोटीमध्ये २७, वनडेमध्ये ५० आणि टी २० मध्ये ३३ बळी देखील घेतले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी शार्दुलचा भारतीय संघामध्ये समावेश करण्यात आला आहे. तर आयपीएल २०२३ मध्ये शार्दुल ठाकूर कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना दिसणार आहे.
क्या बात हैं @imShard 😁
अस्सल #AllRounder 😁😁😁@sunandanlele सर आवडला का 😉 pic.twitter.com/yw9osqVbpG— Bhaskar Ganekar (@BhaskarGanekar) March 1, 2023