स्वतःच्या लग्नामध्ये बेभान होऊन नाचला शार्दुल ठाकूर, नातेवाईकांनी घेतले खांद्यावर, व्हिडीओ व्हायरल…

By Viraltm Team

Published on:

लॉर्ड नावाने प्रसिद्ध भारतीय क्रिकेट टीमचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर भारतीय टीमचा प्रमुख भाग आहे. टीम इंडियाला मैदानामध्ये जेव्हा एखाद्या विकेटची गरज असते तेव्हा शार्दुल ठाकूर ते काम करतो. फलंदाजीमध्ये देखील त्याने अनेक प्रसंगी टीमची मदत केली आहे.

२७ फेब्रुवारी रोजी शार्दुल ठाकूर विवाह बंधनात अडकणार आहे. त्याची मैत्रीण मिटली सोबत शार्दुल ठाकूर सात फेरे घेणार आहे. यादरम्यान लग्नाच्या अगोदर हळदी फ़ंक्शनचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ठाकूर बेभान होऊन नाचताना दिसत आहे. ठाकूरचा नाचतानाचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.

भारतीय टीमचा स्टार क्रिकेटर शार्दुल ठाकुर आपल्या पर्सनल लाईफची नवीन सुरुवात करणार आहे. २७ फेब्रुवारीला शार्दुल त्याची जोडीदार मिताली पारुलकरसोबत विवाह बंधनात अडकणार आहे. लग्नाच्या एक दिवस अगोदर मेहेंदीचे फंक्शन होते. ज्यामध्ये शार्दुलने जबरदस्त डांस केला. शार्दुल ठाकूर या व्हिडीओमध्ये त्याच्या कुटुंबासोबत उपस्थित आहे. पिवळ्या कुर्त्यामध्ये शार्दुल बॉलीवूडच्या हिरोप्रमाणे दिसत आहे. सोशल मिडियावर शार्दुल ठाकूरचा डांसचा हा व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होत आहे.

२०२१ मध्ये शार्दुल आणि मितालीने एंगेजमेंट केली होती. आता एका वर्षानंतर दोघे विवाह बंधनात अडकले आहेत. लग्नाच्या नंतर शार्दुल ठाकूर ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध होणाऱ्या वनडे सीरीजसाठी रवाना होणार आहे. यानंतर तो दिल्ली कॅपिटल्सच्या टीमसाठी २ महिन्यांपर्यंत आयपीएल २०२३ मध्ये व्यास असेल. नंतर याच वर्षाच्या अंतमध्ये तो ५० ओवर वर्ल्ड कपमध्ये देखील खेळणार आहे.

Leave a Comment