Rohit Sharma: BCCI पुन्हा सोपवणार रोहित शर्मावर टी-20 कर्णधारपदाची जबाबदारी, समोर आली मोठी अपडेट

By Viraltm Team

Published on:

Rohit Sharma

Rohit Sharma will Team Indias T20 Captain: भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) चे उच्च अधिकारी गुरुवारी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी तिन्ही फॉरमॅटचा संघ जाहीर करण्यापूर्वी रोहित शर्मा (Rohit Sharma) ला टी-20 संघाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न करतील. गेल्या वर्षी T20 वर्ल्डकप 2022 च्या उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर रोहितने स्वतःला T20 फॉर्मेटपासून दूर ठेवले होते. बीसीसीआयचे सचिव जय शाह निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांची भेट घेतील ज्यात तिन्ही फॉरमॅटच्या संघांव्यतिरिक्त पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या तयारीवरही चर्चा केली जाईल.

Rohit Sharma

BCCI Rohit Sharma कडे पुन्हा T20 कर्णधारपद सोपवण्याचा प्रयत्न करेल

टी-20 चा नियमित कर्णधार हार्दिक पांड्या दुखापतीमुळे पुढील एक महिना पुनरागमन करू शकणार नाही आणि अशामध्ये सुर्यकुमार यादवकडे कर्णधारपद ठेवण्याशिवाय किंवा रोहित शर्मा (Rohit Sharma) कडे हि जबाबदारी सोपवण्याशिव्या BCCI कडे दुसरा पर्याय नाही. रोहितने यापूर्वीच सांगितले होते कि, मला आंतरराष्ट्रीय स्तरावर टी-20 फॉर्मेटमध्ये खेळायचे नाही, परंतु नुकत्याच झालेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये त्याने ज्याप्रकारे कर्णधारपद सांभाळले त्यावरून BCCI ला वाटते कि त्याने 2024 मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपमध्ये खेळून कर्णधारपदही सांभाळायला हवे.

KL Rahul आणि Shreyas Iyer करणार पुनरागमन

दुसरा प्रश्न वर्कलोड मॅनेजमेंटशी संबंधित आहे, कारण भारताला 11 दिवसांच्या आत मर्यादित षटकांचे सहा सामने खेळायचे आहेत. यामध्ये तीन वनडेचाही समावेश आहे. जे पाच दिवसांमध्ये खेळायचे आहेत. या पाच दिवसांमध्ये 26 डिसेंबर रोजी टेस्ट सिरीज सुरु होणार आहे. अशामध्ये टेस्ट संघामध्ये राहुल आणि श्रेयस अय्यरचे पुनरागमन होईल. अजिंक्य रहाणेला वगळले जाऊ शकते, तर चेतेश्वर पुजाराच्या पुनरागमनाची शक्यता कमी आहे.

अजिंक्य रहाणे संघामध्ये स्थान मिळवू शकेल

राहुलने जर यष्टिरक्षकाची जबाबदारीही सांभाळली, तरच रहाणेला संघात स्थान मिळू शकेल. जसप्रीत बुमराह देखील कसोटी क्रिकेट खेळण्यास उत्सुक असून तो मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांच्यासोबत वेगवान गोलंदाजी विभागाची जबाबदारी सांभाळणार आहे. मुकेश कुमारला राखीव वेगवान गोलंदाज म्हणून निवड केली जाऊ शकते. परदेशी परिस्थितीमध्ये रवींद्र जडेजा नेहमीप्रमाणे पहिल्या पसंतीचा स्पिनर असेल. त्याच्यासोबत रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल किंवा कुलदीप यादव यांच्यापैकी एकाची निवड केली जाईल.

Leave a Comment