अपघातानंतर पहिल्यांदाच रिषभ पंतने शेयर केली पोस्ट, त्याला वाचवणाऱ्या ‘त्या’ दोन देवदूतांच्या नावाच्या खुलासा करत मानले आभार…

By Viraltm Team

Published on:

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक रिषभ पंतवर मुंबईच्या कोकिला बेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंतचा ३० डिसेंबर रोजी अपघात झाला होता. यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली होती. नुकतेच त्याच्या गुडघ्यांवर लिगामेंटची सर्जरी सफल झाली आहे. आता पण हळू हळू बारा होत आहे.

अपघातानंतर पहिल्यांदाच रिषभ पंतची प्रतिक्रिया आली आहे. त्याने अनेक लोकांचे आभार मानले आहेतज्यांनी त्याला कठीण काळामध्ये मदत केली. खासकरून त्या दोन देवदूतांचा उल्लेख केला आहे ज्यांनी अपघाताच्या वेळी त्याला योग्य वेळी रुग्णालयात पोहोचण्यास मदत केली होती.

२५ वर्षीय रिषभ पंतने तिच्या ट्विटर हँडलवरून पोस्ट शेयर करत लिहिले आहे कि मी वैयक्तिकरित्या सर्वांचे आभार मानू शकत नाही, पण मला त्या दोघांचे आभार मानायलाच हवेत ज्यांनी मला अपघाताच्यावेळी मदत केली आणि मला सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचण्यास मदत केली. रजत कुमार आणि निशू कुमार तुमचे आभार. मी नेहमीच तुमचा ऋणी राहीन.

पंतने सोशल मिडियाद्वारे आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे. त्याने लिहिले आहे कि सर्वांच्या सपोर्ट आणि शुभेच्छांसाठी मी आभारी आहे. फक्त सर्वांचा एवढेच सांगायचे आहे कि माझी सर्जरी सफल झाली आहे. मी आता बारा होण्याच्या मार्गावर आहे. पंतने बीसीसीआईचे सचिव जय शाह आणि सरकारी अधिकाऱ्यांशिवाय डॉक्टरांचे आणि फिजियो टीमचे देखील आभार मानले आहेत.

पंत २०२३ पर्यंत क्रिकेट पासून दूर राहू शकतो. यावर्षी त्याची विश्वचषकात खेळण्याची शक्यता देखील कमी आहे. पंतला पूर्णपणे बरे होण्यासाठी ८ महिने लागू शकतात. पुढील ६ आठवड्यांमध्ये त्याच्यावर दुसरी लिगामेंट सर्जरी होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment