भारतीय क्रिकेट टीमचा स्टार खेळाडू रिषभ पंतचा शुक्रवारी ३० डिसेंबर रोजी रूडकीच्या जवळ कार अपघात झाला होता ज्यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला होता. यानंतर रिषभ पंतला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पंतचे चाहते त्याने लवकर बरा व्हावा म्हणून प्रार्थना करत आहेत.
दरम्यान त्याचा अपघात कसा झाला याचीच चर्चा सर्वत्र होत आहे आणि त्याबद्दल अनेक वक्तव्य समोर येत आहेत. आता एनएचएआयच्या अधिकाऱ्याने मोठा खुलासा केला असून पंत यांचा अपघात ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी रस्त्यावर खड्डेचा नव्हते अशी माहिती समोर आली आहे.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) च्या अधिकाऱ्याने सांगितले कि ज्या रस्त्यावर क्रिकेटर रिषभ पंतचा अपघात झाला होता तिथे खड्डाच नव्हता. एनएचएआई रूडकी डिवीजनचे संचालक प्रदीप सिंग गुसैन म्हणाले कि ज्या ठिकाणी अपघात झाला तिथे रस्त्यावर एकही खड्डा नव्हता. ज्या रस्त्यावर त्याचा अपघात झाला तो रस्ता महामार्गाला लागून असलेल्या कालव्यामुळे अरुंद आहे. या कालव्याच्या सिंचनासाठी वापर केला जातो.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी रविवारी डेहराडूनमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये क्रिकेटर ऋषभ पंतची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी सांगितले होते कि पंतने त्यांना सांगितले कि त्याच्या कारला अपघात झाला जेव्हा तो राजमार्गवर एका खड्यातून वाचण्याच्या प्रयत्न करत होता. पुष्कर सिंह धामीने पंतच्या भेटीनंतर पत्रकारांना सांगितले होते कि क्रिकेटर खड्डा किंवा एखाद्या काळ्या गोष्टीपासून वाचण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यामध्ये त्याचा कारवरून ताबा सुटला.
याआधी शनिवार रिषभला भेटणारे दिल्ली तथा जिल्हा क्रिकेट संघाचे संचालक श्याम शर्माने देखील रिषभ पंतकडून बोलताना सांगितले होते कि शुक्रवारी जेव्हा तो एका खड्डयापासून वाचण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा त्याच्या कारला अपघात झाला.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.