Ladli Behna Yojna: लाडली बहना योजनेसाठी अर्ज कसा करावा, कोणती कागदपत्रे आहेत आवश्यक?

By Viraltm Team

Published on:

Ladli Behna Yojna

Ladli Behna Yojna: नुकतेच झालेल्या मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्य सरकारची लाडली बहना योजना खूपच चर्चेमध्ये आली आहे. महिला आणि त्यांच्या मुलांचे आरोग्य सुधारणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत मध्य प्रदेश सरकार महिलांना आर्थिक रूपाने मदत करते. सरकार या योजनेद्वारे राज्यातील 1.2 करोड महिलांना दर महिन्याला 1250 रुपये देते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही कुटुंबातील महिला अर्ज करू शकतात आणि या योजनेसाठी अर्ज करण्याचे किमान वय 21 वर्षे आहे.

सर्व वर्गामधील महिला घेऊ शकतात Ladli Behna Yojna चा लाभ

सामान्य वर्गातील महिला असो किंवा मागासवर्गीय, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा अल्पसंख्याक, सर्वजण या योजनेसाठी अर्ज करू शकतात. या योजनेमध्ये 21 ते 60 वायोगातैल महिला अर्ज करू शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे काही महत्वाची कागदपत्रे असणे अवश्य आहे. यासाठी आधार कार्ड, फोटो बँक खाते तपशील आणि मोबाइल नंबर, मूळ रहिवाशी दाखला असणे आवश्यक आहे. जन्मतारीख सिद्ध करण्यासाठी जन्म प्रमाणपत्र सादर करने बंधनकारक आहे.

Ladli Behna Yojna

कुठे मिळतो अर्ज

या योजनेसाठी राज्य सरकारद्वारे अर्थसंकल्पात 60 हजार करोडची तरतूदही करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याच्या 10 तारखेला १००० रुपये जमा केले जातात. अर्जाचा नमुना ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध आहे. भरलेला अर्ज Ladli Behna Yojna पोर्टलवर प्रविष्ट केला जाईल. अर्ज भरताना महिला अर्जदाराचे छायाचित्र घेतले जाते.

आधार लिंक आणि DBT

अर्ज दाखल केल्यानंतर प्राप्त झालेला अर्ज क्रमांक पावतीमध्ये नोंदवला जातो आणि अर्जदाराला दिला जातो. या योजनेची रक्कम महिलांच्या खात्यामध्ये यावी यासाठी केवायसी करने आवश्यक आहे. महिलेच्या बँक खात्यात आधार लिंक आणि डीबीटी सक्रिय असणे आवश्यक आहे. तरच खात्यामध्ये पैसे पडतील.

LIC Jeevan Utsav : आजीवन गॅरंटीड रिटर्न आणि इन्शुरन्स कव्हर, LIC ने आणली नवीन स्कीम, मिळणार बंपर फायदे

Leave a Comment