क्रिकेट पासून दूर शेतीमध्ये रमला धोनी, शेतामध्ये चालवला ट्रॅक्टर, चाहत्यांना आवडला धोनीचा हा अंदाज…

By Viraltm Team

Published on:

क्रिकेट जगतामधील दिग्गज खेळाडूपैकी एक महेंद्र सिंह धोनीला आज कोणाच्याही ओळखीची गरज नाही. महेंद्र सिंह धोनीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे आणि तो क्रिकेट प्रेमींच्या हृदयात असतो. महेंद्र सिंह धोनी फक्त क्रिकेट जगतामध्येच नाही तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील नाव कमावण्यास सुरुवात केली आहे.

यादरम्यान महेंद्र सिंह धोनीचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो शेतामध्ये ट्रॅक्टर चालवताना पाहायला मिळत आहे. सोशल मिडियावर धोनीचा एक व्हिडीओ खूप पसंद केला जात आहे ज्यावर ऑलराउंडर रवींद्र जडेजापासून अनेक चाहते कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये पाहू शकता कि महेंद्र सिंह धोनी शेतामध्ये ट्रॅक्टर चालवताना पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेयर करत महेंद्र सिंह धोनीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “काहीतरी नवीन शिकणे चांगले आहे, पण काम पूर्ण करायला खूप वेळ लागला.” विशेष म्हणजे एमएस धोनीने जवळपास २ वर्षांनंतर इंस्टाग्रामवर पोस्ट शेयर केली आहे. अशामध्ये चाहत्यांमध्ये खूपच उत्साह पाहायला मिळत आहे.

यादरम्यान भारत आणि चेन्नई सुपर किंग्ससोबत रवींद्र जादेडाने देखील मजेदार कमेंट करत लिहिले आहे कि, “नो. नंबर प्लेट..” यावर चाहते देखील कमेंट करताना पाहायला मिळत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले आहे कि हा धोनी आहे जग त्याला ओळखते. याआधी धोनीने ८ जानेवारी २०२१ रोजी शेवटची पोस्ट केली होती.यादरम्यान भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार आपल्या शेतामध्ये स्ट्रॉबेरी तोडून खाताना दिसत आहे. यादरम्यान त्याने एक फोटो शेयर करत लिहिले होते कि जर शेतामध्ये गेलो तर मार्केटस्तही स्ट्रॉबेरी शिल्लक राहणार नाही. महेंद्र सिंह धोनीच्या वर्कफ़्रंट बद्दल बोलायचे झाले तर आयपीएल २०२३ चे आयोजन भारतामध्ये होणार आहे. अशामध्ये धोनीचे हे शेवटचे आयपीएल ठरू शकते. यानंतर महेंद्र सिंह धोनी मैदानावर दिसणार नाही. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने जवळपास ४ वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by M S Dhoni (@mahi7781)

त्याच्या शेवटच्या सामन्याकडून चाहत्यांना खूप आशा आहेत. त्याचबरोबर धोनी पाचवे विजेतेपद पटकावल्यानंतरच चाहत्यांना निरोप देईल असा चाहते अंदाज लावत आहेत. अशामध्ये धोनीच्या चाहत्यांसाठी यंदाचे आयपीएल खूपच खास राहणार आहे.

Leave a Comment