रांचीमध्ये एमएस धोनीनेने बनवले आहे आलिशान फार्म हाऊस, जिम पासून ते स्विमिंग पूल-पार्क पर्यंत आहेत सर्व सुविधा…

By Viraltm Team

Published on:

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन तीन वर्षे झाली आहेत. मात्र आज देखील त्याच्याबद्दल चाहत्यांची क्रेझ कमी झालेली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी आपला बहुतांश वेळ रांचीमध्ये घालवतो.
त्याला कार आणि बाईकची खूप आवड आहे. त्याचबरोबर धोनीला ग्रीनरी देखील खूप पसंद आहे. त्याने रांचीमध्ये रिंग रोडजवळ ७ एकरमध्ये एक फार्म हाऊस बनवले आहे ज्यामध्ये सर्वप्रकारच्या सुविधा आहेत. चला तर पाहूयात कसे आहे धोनीचे आलिशान फार्म हाऊस आणि कोणत्या कोणत्या सुविधा आतमध्ये आहेत.

फार्म हाऊसमध्ये आहेत अनेक सुविधा : धोनीचे हे फार्म हाऊस झारखंडची राजधानी रांचीमध्ये रिंग रोडजवळ ७ एकरमध्ये बनवले आहे. यामध्ये जिम, स्विमिंग पूल, पार्क आणि बेडरूम अशा सर्व सुविधा आहेत.
तीन वर्षांमध्ये बनून झाले पूर्ण: रांचीमध्ये भारतीय टीमचा माजी कर्णधार धोनीचे फॉर्म हाऊस नेहमी चर्चेत असते. जे धोनीने शानदार प्रकारे सजवले आहे. इथे भारतीय टीममध्ये खेळत असलेल्या खेळाडूंना नेहमी पाहिले जाते.
रांचीच्या रिंग रोडजवळ आहे धोनीचे आलिशान फार्म हाऊस: रांचीच्या रिंगरोडजवळ धोनीचे फार्म हाऊस सुमारे तीन वर्षांमध्ये पूर्ण झाले आहे. याचे डिझाईन स्वतः धोनीने केले आहे, यामध्ये अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत.

स्विमिंग पूल आणि जिम सारख्या सुविधा आहेत उपलब्ध: या फॉर्म हाऊसमध्ये धोनीसाठी प्रॅक्टिस एरिया सोबत स्विमिंग पूल आणि जिम सारख्या लक्झरी सुविधा देखील आहेत. धोनीची पत्नी साक्षी आणि जीवाने देखील अनेकवेळा येथील फोटो इंस्टावर शेयर केले आहेत.
सध्याच्या टीमचे खेळाडूही आले आहेत इथे: महेंद्र सिंह धोनीने या फार्महाऊसवर भारतीय टीम मधील खेळाडूंना देखील आणले आहे. नुकतेच एका देशांतर्गत सामन्यासाठी रांचीला गेलेल्या खेळाडूंना धोनीने येथे बोलावले होते.

२०१९ मध्ये खेळला होता शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना: धोनीने आपला शेवटचा वनडे सामना आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. जिथे भारतीय टीम उपांत्य फेरीतील सामना हरल्यानंतर बाहेर पडला होता.

या वर्षी शेवटचा आईपीएलमध्ये दिसू शकतो. धोनी आता या वर्षी आपले शेवटचे आईपीएल खेळू शकतो. त्याने भारतीय क्रिकेटला प्रत्येक फॉरमॅटमध्ये नंबर वन बनवले आहे.
भारताला जिंकून दिल्या आहेत आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी: धोनीने २००७ मध्ये टी२० विश्वचषक, २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. तो भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार राहिला आहे.

Leave a Comment