चुलबुल पांडे बनला धोनी ! आयपीएलपूर्वी माही ला पोलिसाच्या भूमिकेत पाहून चाहते थक्क झाले, फोटो झाले व्हायरल…

By Viraltm Team

Published on:

एमएस धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. तो आता फक्त आयपीएलमध्ये खेळताना पाहायला मिळतो. त्याने आयपीएल २०२३ ची तयारी देखील सुरु केली आहे. यादरम्यान त्याचा एक फोटो सध्या सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये धोनी पोलीस ऑफिसरच्या ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहे.

एमएस धोनीकडे भारतीय सेनेमधील लेफ्टनंट कर्नलचे मानद पद आहे. तो अनेकवेळा आर्मी यूनिफॉर्ममध्ये पाहायला मिळाला आहे. तथापि या जाहिरातीसाठी एमएस धोनी पोलीस वर्दी घातलेला पाहायला मिळत आहे. एमएस धोनीचा हा फोटो सोशल मिडियावर खूपच वेगाने व्हायरल होत आहे.

एमएस धोनी फिल्म इंडस्ट्री आपल्या क्षमता सिद्ध करण्यासाठी सज्ज आहे. धोनीच्या प्रोडक्शन कंपनी धोनी एंटरटेनमेंटने एका तमिळ चित्रपटाची निर्मिती केली आहे. लेट्स गेट मॅरीड असे या चित्रपटाचे नाव आहे.

चित्रपटामध्ये नादिया, हरीश कल्याण आणि अभिनेत्री इवाना मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहेत. दुसरीकडे योगी बाबू देखील या चित्रपटाचा एक महत्वपूर्ण भाग आहेत. महेंद्र सिंह धोनीची पत्नी साक्षी धोनी या चित्रपटाची निर्माती आहे. चित्रपटाबदल सध्या धोनीचे चाहते खूपच उत्सुक आहेत.

सीएसकेने महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चारवेळा आयपीएल जिंकले आहे. आयपीएल २०२३ मध्ये देखील तो चेन्नईकडून खेळताना दिसणार आहे. आयपीएल २०२२ मध्ये धोनीने चेन्नई सुपर किंग संघाचे कर्णधार पद सोडले होते आणि त्यानंतर रवींद्र जडेजा चेन्नई संघाचा कर्णधार झाला होता. मात्र अल्पावधीमध्येच धोनीने कर्णधारपदाची धुरा पुन्हा सांभाळली. यावेळी देखील तो संघाला चांगल्या प्रकारे सांभाळताना दिसणार आहे.

Leave a Comment