‘मासिक पाळी’दरम्यान काय असते महिला क्रिकेटर्सची अवस्था ? ‘झुलन गोस्वामी’ने केला खुलासा, म्हणाली; वेदना होत असतात आणि…

By Viraltm Team

Published on:

भारतीय महिला क्रिकेट टीमची चकदा एक्सप्रेस म्हणून ओळखली जाणारी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने क्रिकेटमधून निर्वृत्ती घोषित केली आहे. पुढच्या महिन्यामध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या सिरीजमध्ये ती आपल्या करियरमधील शेवटचा सामना खेळणार आहे. क्रिकेटमधून सन्यास घेण्यापूर्वी झुलनने आपल्या नुकत्याच झालेल्या मुलाखतीमध्ये महिला खेळाडूंच्या गंभीर समस्येसंबंधी बातचीत केली. भारताचे माजी प्रशिक्षक डब्ल्यूव्ही रमन यांचे स्वतःचे युट्युब चॅनल आहे. यावर त्यांनी आपले एक टॉक शो सुरु केला आहे. त्यांच्या नवीन टॉक शो वेडनेसडे विद डब्लू वीच्या पहिल्या एपिसोडमध्ये झुलन गोस्वामी पाहुणी म्हणून आली होती.

यावेळी तिने महिला खेळाडूंच्या पीरियड्स बद्दल येणाऱ्या समस्यांवर बातचीत केली. तिने सांगितले कि पीरियड्सचा महिला खेळाडूंवर काय परिणाम पडतो. यासोबत तिने पीरियड्सचे प्रभाव समजण्यासाठी वैज्ञानिक संशोधन करण्याबाबतही सांगितले. तिने म्हंटले कि हे खूपच कष्टदायक असते. जेव्हा महिला पीरियड्स मधून जास्त असतात. महिला खेळाडूंना पीरियड्सदरम्यान वेदनांबद्दल बोलताना झुलन म्हणाली कि प्रत्येक खेळाडूची इच्छा असते कि तो खेळादरम्यान रिलॅक्स असावा पण पीरियड्समुळे महिला खेळाडूंना नेहमी वेदना आणि चिडचिडेपणा सहन करावा लागतो.

ती पुढे म्हणाली कि खास करून क्रिकेटमध्ये पीरियड्स दरम्यान मैदानामध्ये ६-६ तास घालवणे आणि वरून चांगले प्रदर्शन करण्याचा दबाव सोपा नसतो. अशा स्थितीमध्ये महिला खेळाडूला आराम करण्यासाठी देखील वेळ मागू शकत नाही. अशा स्थितीमध्ये मैदानामध्ये पूर्ण फोकस आणि एनर्जीसोबत खेळावे लागते, पण लोक महिला एथलीट्सच्या वेदना समजू शकत नाहीत. तो नेहमी म्हणतात कि हिला काय झाले आहे यार ? तर त्यांना हे माहिती नसते कि यामागे कोणते कारण आहे. हीच अवस्था जगभरामधील सर्व महिला खेळाडूंची असते.

पीरियड्समध्ये होणाऱ्या वेदनामुळे प्रत्येक महिला बेडवर झोपून आराम करू इच्छिते पण आमच्याजवळ कोणतेच ऑप्शन नसेत. तुम्हाला सामना महत्वाचा आहे. तुम्हाला अंथरून सोडून जाऊन मैदानावर सहा तास घालवायचे आहेत. तुम्ही बसून कोणताही बहाणा करू शकत नाही. हे नॉर्मल आहे. आम्ही याला स्वीकार केले आहे आणि आम्ही यानुसारच तयारी करतो, हीच महिला एथलीट्सची ब्यूटी आहे.

झुलन पुढे म्हणाली कि ती छोट्या वयापासूनच कोणासोबत या विषयावर बोलत नव्हती. तिने या वेदना आपल्यापर्यंतच सीमित ठेवल्या. ना घरच्यांना सांगितले ना कोचला काही सांगितले, फक्त गपचूप यावर लढत राहिली. झुलन म्हणते कि पीरियड्समध्ये खूप विज्ञान इन्वॉल्व्ड आहे. या विषयावर योग्य रिसर्च होणे खूपच महत्वाचे आहे. हे शोधले पाहिजे कि असा कोणता मार्ग आहे का कि ज्यामुळे महिला खेळाडू टूर्नामेंट्सनुसार पीरियड्स अडजस्ट करू शकेल. कारण आज सायन्स खूपच पुढे निघून गेले आहे, तर यावर देखील काम केले पाहिजे.

Leave a Comment