भारतीय क्रिकेटर्सच्या बहिणी, कोणी करतात मॉडलिंग तर कोणी आहेत राजकारणामध्ये लीडर…

By Viraltm Team

Published on:

देशभरामध्ये रक्षाबंधन उत्सव उत्साहामध्ये साजरा केला जात आहे. भारतीय क्रिकेटर्स देखील सोशल मिडिया आपल्या बहिणींसोबत फोटो शेयर करून या उत्सवाच्या शुभेच्छा देत आहेत. क्रिकेटर्स आणि त्यांची लाइफस्टाइल भारतीय लोक फॉलो करतात, पण अनेक क्रिकेटर्सच्या बहिणी अशा ज्या त्यांच्या करियरमध्ये खूपच लोकप्रिय आहेत.

दीपक चहरची बहिण मालती चहर: दीपक चहरची बहिण मालती चहर सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते आणि तिचे १ मिलियन पेक्षा जास्त फ़ॉलोवर आहेत. ३२ वर्षाची मालती अभिनेत्री आणि मॉडल आहे. ती चित्रपटांसोबत वेब सीरीजमध्ये देखील पाहायला मिळाली आहे.

रविंद्र जडेजाची बहिण नैना जडेजा: टीम इंडियाचा ऑलराउंडर खेळाडू रविंद्र जडेजाच्या बहिणीचे नाव नैना जडेजा आहे. नैनाने आपल्या कुटुंबाला सपोर्ट करण्यासाठी खूप मेहनत केली, जेव्हा रवींद्र जडेजा १७ वर्षाचा होता तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले होते. त्यावेळी नैनाने एक नर्स म्हणून जॉब करून आपल्या कुटुंबाची आर्थिक मदत केली होती. रवींद्र जडेजाच्या बहिणीने २०१९ मध्ये कांग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि तिने राजकारणामध्ये आपल्या करियरची सुरुवात केली. तिच्यासोबत तिच्या वडिलांनी देखील कांग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

हरभजन सिंहच्या बहिणी: हरभजन सिंहच्या बहिणींनी हरभजन सिंहला क्रिकेटमध्ये करियर करण्यासाठी खूपच मदत केली होती. ज्याबद्दल हरभजन सिंह नेहमी आपल्या मुलाखतीदरम्यान सांगत असतो. हरभजन सिंहला ५ बहिणी आहेत.

वीरेन्द्र सेहवाग: वीरेन्द्र सेहवागला दोन बहिणी आहेत. एकीचे नाव मंजू आणि दुसरीचे नाव अंजू आहे. अंजू राजकारणामध्ये आहे आणि तिने कांग्रेसकडून निवडणूक देखील लढवली आहे. सेहवाग देखील अनेकवेळा आपल्या बहिणीच्या प्रचारामध्ये दिसला होता.

विराट कोहलीची बहिणी भावना कोहली: टीम इंडियाचा पूर्व कप्तान विराट कोहलीच्या बहिणीचे नाव भावना आहे. कोहली देखील आपल्या कुटुंबासोबत दिल्लीमध्ये राहतो पण आता तो अनुष्कासोबत मुंबईमध्ये शिफ्ट झाला आहे. तर भावनाचे लग्न संजय ढींगरासोबत झाले होते आणि तिचे कुटुंब आता दिल्लीमध्ये राहते. भावना कोहली सोशल मीडियावर आपल्या भावासोबतचे फोटो शेयर करत आसते.

सचिन तेंडुलकरची बहिण सविता: सचिन तेंडुलकरच्या कुटुंबामध्ये एकूण ४ भाऊ-बहिण आहेत. सचिनसोबत ३ भाऊ आहेत आणि फक्त एक बहिण आहे. सचिनच्या बहिणीचे नाव सविता तेंडुलकर आहे आणि सचिन नेहमी तिच्यासोबत रक्षाबंधनचा उत्सव साजरा करतानाचा फोटो शेयर करत असतो.

Leave a Comment