Mata Vaishno Devi Dham: भारतीय क्रिकेट संघाचे माजी सदस्य आणि दिग्गज क्रिकेटपटू हरभजन सिंग, श्रीसंत आणि राहुल शर्मा लेजेंड्स प्रीमियर लीग स्पर्धेत भाग घेण्यासाठी जम्मू येथे आले होते, यादरम्यान त्यांनी माँ वैष्णो देवी (Mata Vaishno Devi) चे दर्शन घेतले. वैष्णो देवीचे दर्शन घेत खेळाडूंनी आपापल्या संघाच्या यशासाठी प्रार्थना केली.
श्रीसंत आणि राहुल शर्मा मंगळवारी पाहते बेस कॅम्प कटरा येथे पोहोचले आणि तेथून हेलिकॉप्टरने माँ वैष्णोदेवीचे दिव्य दर्शन घेण्यासाठी रवाना झाले, तर हरभजन सिंह माँ वैष्णोदेवीचे दिव्य दर्शन घेण्यासाठी नवीन तारकोटमार्गे कारमध्ये रवाना झाला. तिघेही माँ वैष्णोदेवी (Mata Vaishno Devi Dham) चे दिव्य दर्शन घेतल्यानंतर दुपारी बेस कॅम्प कटरा येथे पोहोचले आणि जम्मूकडे रवाना झाले.
येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतात आंतरराष्ट्रीय सामने
यादरम्यान संवाद साधताना हरभजन सिंग (Harbhajan Singh), श्रीसंत आणि राहुल शर्मा म्हणाले की, अनेक वर्षांनंतर जम्मूमध्ये क्रिकेट खेळणे खूपच आनंददायी आहे. अनेक वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये एक सुखद झुळूक आली आहे.
जम्मू-काश्मीरमधील बदलती परिस्थिती पाहून दिग्गज क्रिकेटपटू म्हणाले कि आगामी काळामध्ये नक्कीच जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सामने होतील. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून स्थानिक लोकांना उत्कृष्ट क्रिकेट बघायला मिले आणि जम्मू-काश्मीरमधील युवकांची चांगली प्रगती होईल. त्याचबरोबर खेळामध्ये विशेषतः क्रिकेटमध्ये नवीन तरुणांना संधी मिळेल.
Mata Vaishno Devi Dham: फायनलच्या पराभवावर बोलला हरभजन सिंह
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघाच्या पराभवाबद्दल बोलताना हरभजन सिंह म्हणाला कि, भारतीय टीम जगातील सर्वोत्तम संघ आहे यामध्ये काहीच शंका नाही, प्रत्येक संघाचा एक दिवस असतो, कदाचित आमच्या संघाचा दिवस चांगला नव्हता यामुळे पराभव स्वीकारावा लागला. हरभजन सिंग जम्मूमध्ये सुरू असलेल्या लिजेंड प्रीमियर लीगमध्ये मणिपाल टायगर्स संघाकडून खेळण्यासाठी आला होता, तथापि या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. तर, श्रीसंत (Sreesanth)गुजरात जायंट्स संघाचा सदस्य आहे.