Ear wax cleaning Remedies at home निरोगी शरीर व्यक्तीची सर्वात मोठी धनसंपदा आहे. एखाद्या व्यक्ती खूप श्रीमंत आहे आणि ती जर निरोगी नसेल तर त्याचे सर्वधन शून्य आहे. अनेक दुर्धर आजारामुळे तो जर त्याच्या धनाचा उपयोग करू शकत नसेल तर काय उपयोग आहे संपत्तीचा? आपण आपल्या शरीराकडे लक्ष देऊन त्याची खूप काळजी घेत असतो. आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचे कान, नाक, जिभ, डोळे, त्वचा ही पाच पंचेंद्रिय आहेत.आपण रोज दैनंदिन आंघोळ करणे, दात घासणे, नखे कापणे, डोळ्याची व्यवस्थित स्वच्छता ठेवणे अशा सर्व प्रकारची कामे आपण करत असतो. मग आपण आपल्या कानाच्या स्वच्छतेकडे का लक्ष देत नाहीत?
जर आपण आपल्या कानाची स्वच्छता वेळेवर केली तर आपण अनेक गोष्टी किंवा आजारापासून मुक्त होऊ शकतो. बरेच जण आपल्या कानाची स्वच्छता करण्यासाठी नको त्या साहित्याचा जसे की सेफ्टी पिन, पेन याचा वापर करून स्वच्छता करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा साहित्याचा वापर करण्याने आपल्या कानाच्या नाजूक पडद्याला इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मित्रांनो आज आपण कान स्वच्छ करण्याच्या काही सोप्या पद्धती जाणून घेणार आहोत.
आपल्या कानामध्ये जी मळ जमते ती असणे अत्यंत गरजेचं असतं. कारण बाहेरील हवा धूळ बाहेरचा अतितीव्र ध्वनी ती अडवण्यासाठी कानात मेन तयार होत, परंतु प्रमाणापेक्षा जास्त मळ अनेक रोगांना निमंत्रण देत असत. कान, नाक, जीभ हे तीन इंद्रिय एका छोट्या नलिकेद्वारे एकमेकाला जोडलेले असतात त्यामुळे प्रमाणापेक्षा कानात जास्त असलेला मळ महिन्यातून आपण किमान दोन-तीन वेळा काढायला पाहिजे.
पहिला उपाय
यासाठी पहिला उपाय असा की आल्याचा रस व लिंबाचा रस मिक्स करून ते एअरबडला लावून कानातून हळुवार फिरवा. त्याला बऱ्यापैकी कानातील मळ चिटकून बाहेर येईल.
काहीजण कानातील मळ काढण्यासाठी खोबऱ्याचे तेल कानात टाकत असतात. त्याऐवजी कानात बदामाचे तेल टाकले तर कानातील घट्ट झालेला मळ पातळ होतो आणि तो बाहेर निघतो.
तिसरा उपाय
तिसरा उपाय म्हणजे एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मीठ टाकून त्याचे मिश्रण चांगले मिसळावे. पाण्याचे दोन- तीन थेंब कानात टाकले आणि पाच दहा मिनिट ठेवले तर त्यामुळेही कानातील बऱ्यापैकी मळ बाहेर निघून जाईल
चौथा उपाय
चौथा उपाय असा आहे की प्रत्येकाच्या घरी कांदा असतो कांद्याचा रस कानात टाकला आणि पाच मिनिटात तो रस कानातून काढून टाकला तर त्यामुळे कानातील मळ बाहेर निघून जाईल
आपल्या प्रत्येकाच्या घरी मसाल्यांमध्ये ओवा असतोच. दूध गरम करून त्यात एक चमचा ओवा टाका आणि तो गाळून घ्यावा. त्याचे दोन-तीन थेंब कानात टाकल्या तर त्यामुळे कानाची ऐकण्याची क्षमता खूप वाढेल. जर तुमची श्रवण शक्ती खूप कमी असेल तर नक्कीच फरक जाणवेल. महिन्यातून किमान दोन-तीन वेळा केला तरी चालेल.
जर एखाद्याच्या कानाला जखम झालेली असेल तर त्याला मिठाचा पाणी टाकणं शक्य होत नाही. अशा व्यक्तीने एक वाटी पाणी गरम करून त्यात एक चमचा हळद आणि थोडीशी तुरटी टाकावी आणि त्याचे मिश्रण गरम करावे. मिश्रणाला चांगली उकळी आल्यानंतर ते कोमट होण्याची वाट पाहावी आणि ते चांगले गाळून घ्यावे. आणि त्यातले काही थेंब कानात टाकावे त्यामुळे कानातील जखम बरी होण्यास मदत होईल.या उपायाने आपण आपल्या कानाला हात न लावता, आपल्या कानाला इजा न होता, आपण आपले कान स्वच्छ करू शकतो.
टीप :-या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहेत. यातील उपाय आपण अमलात आणण्यापूर्वी तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा. viraltm.co याची पुष्टी करत नाही तज्ञांशी संपर्क साधावा
मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.
किस केल्याने शरीराल मिळतात हे ८ फायदे, Kiss Benefits जाणून तुम्ही देखील व्हाल थक्क!