Benefits of Clove: भारतीय मसाल्यांमध्ये लवंगाला सर्वात महत्वाचे स्थान आहे. लवंग जेवणाची चव तर वाध्व्तेच त्याचबरोबर आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. भारतीय आयुर्वेदामध्ये लवंग औषध म्हणून वापरले जाते. याचा प्रयोग सामान्यतः पोटदुखीपासून ते खोकला आणि सर्दीपर्यंतच्या इलाजासाठी केला जातो. पण याशिवाय फॅटी लिव्हर आणि मधुमेहावर देखील लवंगचा अचूक उपाय आहे. जाणून घ्या याचे फायदे.
लवंगाचे फायदे (Benefits of Clove)
1. फॅटी लिव्हरसाठी लवंग गुणकारी: लवंग (Clove) मध्ये अँटिऑक्सिडंट्स आढळतात. या कारणामुळे लवंग शरीराच्या अवयवांसाठी विशेषतः यकृताच्या आरोग्यासाठी चांगली मानली जाते. लवंगमध्ये हेपॅटोप्रोटेक्टिव्ह गुणधर्म देखील असतात, जे फ्री मेटाबोलिकमुळे होणा-या परिणामांचा प्रतिकार करतात.
2. डायबिटीजमध्ये फायदेशीर: लवंग डायबिटीजच्या रुग्णांसाठी देखील खूप फायदेशीर ठरू शकते. डायबिटीजच्या रुग्णांना इन्सुलिनची आवश्यकता असते. अशा परिस्थितीमध्ये लवंगाच्या सेवनाने शरीरात इन्सुलिन तयार होण्यास मदत मिळते आणि रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात राहते.
3. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी: लवंगमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे गुण असतात. यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी झाली तर लवंगचे सेवन करायला हवे. लवंग शरीरातील पांढऱ्या पेशी वाढवण्याचे काम करते.
4. श्वासाची दुर्गंधी दूर करते: लवंग सर्वात मोठी खासियत म्हणजे लवंगमध्ये एक खास सुगंध असतो. जो श्वासाची दुर्गंधी दूर करतो. तुम्ही कच्चे लवंग देखील खाऊ शकता यामुळे श्वासाची दुर्गंधी दूर होते.
5. खोकल्यासाठी प्रभावी: अँटिऑक्सिडेंट आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्मांनी समृद्ध असलेली लवंग खोकल्यावर प्रभावी उपाय ठरते. घश्यातील खवखव दूर करण्यासाठी तुम्ही कच्चे लवंग खाऊ शकता. कोरडा खोकला असेल तर लवंग खूपच फायदेशीर ठरते.
पुरुषांसाठी फायदेशीर लवंगचे दुध (Benefits of Clove)
तज्ज्ञांच्या मते रात्री झोपण्यापूर्वी 3 लवंग दुधामध्ये मिसळून पिऊ शकता. लवंगचे पावडर देखील मिसळू शकता. जर तुम्हाला या दुधाची पेस्ट पसंद आली नाही तर पहिला लवंग खाऊन नंतर दुधाचे सेवन करावे. दुध आणि लवंग एकत्र घेतल्याने पौरुष शक्ती वाढण्यास मदत मिळते. लवंगचे नियमित सेवन केल्यास पुरुषांना शीघ्रपतन सारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
Almond Benefits: वजन कमी करण्यासोबतच हृदयासाठीही फायदेशीर आहे बदाम, जाणून घ्या बदाम खाण्याचे फायदे