सौंदर्याच्या बाबतीत बॉलीवूड अभिनेत्रींना देखील मात देते मलिंगाची पत्नी, पहिल्या नजरेमध्येच फिदा झाला होता यॉर्कर किंग…

By Viraltm Team

Published on:

क्रिकेट प्रेमींसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आता क्रिकेट खेळताना मैदानामध्ये पाहायला मिळणार नाही. त्याने क्रिकेटमध्ये सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती घोषित केली आहे. त्याने सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरून निवृत्तीची घोषणा केली आहे.

निवृत्तीनंतर त्याचे उत्कृष्ट क्रिकेटची सांगता झाली. मलिंगा आपल्या वेगवान यॉर्कर गोलंदाजीसाठी खूप प्रसिद्ध होता. आपल्या कौशल्याच्या जोरावर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ आपले स्थान निर्माण केले नाही तर आपला ठसाही उमटवला.टेस्ट, वन डे आणि टी २० क्रिकेटमध्ये मलिंगाने आपल्या गोलंदाजीने अनेक खेळाडूंना शिकार बनवले. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे, आतापर्यंत या विक्रमाची बरोबरी कोणीही करू शकलेले नाही.

खेळासोबत आपल्या मालिका त्याच्या पर्सनल लाईफमुळे देखील खूप चर्चेमध्ये राहिला. ती बराच काळ मुंबई इंडियन संघाचा भाग देखील राहिला. त्याची लव्ह स्टोरी खूपच रंजक आहे. त्याची पत्नी तानिया मिनोली पेरेरासोबत त्याची पहिली भेट खूपच रोमँटिक होती.

मलिंगा एकदा एका जाहिरातीच्या शुटींगसाठी हिक्काडुआ येथील हॉटेलमध्ये थांबला होता. तानिया त्यावेळी त्या कंपनीमध्ये एक इवेंट मॅनेजर होती, पहिल्या नजरेत मलिंगा तानियाच्या सौंदर्यावर क्लीन बोल्ड झाला होता.दुसऱ्यांदा ते दोघे गालेच्या एका हॉटेलमध्ये भेटले होते. तेव्हा त्यांनी आपला फोन नंबर शेयर केला, इथून दोघांमध्ये संवाद सुरु झाला. पुन्हा एक दिवस मलिंगाने तानियाला आपल्या मनातील गोष्ट सांगून टाकली आणि तिला प्रपोज केले. २२ जानेवारी २०१० रोजी दोघांनी लग्न केले आणि आता दोघांना दोन मुले आहेत.

मलिंगाचे सुंदर सुखी कुटुंब आहे. पण एकदा त्याचा खेळाडू थिसारा परेरासोबत वाद झाला होता. वास्तविक मलिंगाची पत्नी तानियाने थिसारावर आरोप लावला होता कि श्रीलंका टीममध्ये स्थान मिळवण्यासाठी त्याने देशाच्या क्रीडामंत्र्यांशी संपर्क केला होता. याचे उत्तर देताना परेराने सोशल मिडियावर त्याला चोख प्रत्युत्तर दिले.

Leave a Comment