लग्नानंतर ‘दीपक चहर’ने शेअर केली ‘भलतीच’ पोस्ट, ‘हनिमून’च्या दिवशी क्रिकेट मॅचपेक्षा जास्त दबाव…

By Viraltm Team

Published on:

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने १ जून २०२२ रोजी दिल्लीतील आग्रा येते जया भारद्वाजसोबत लगीनगाठ बांधली. दुखापतीमुळे दीपक चहर यंदाच्या आयपीएलमध्ये खेळू शकला नाही. नुकतेच दीपकने सोशल मिडियावरून एक व्हिडीओ शेयर केला आहे.

व्हिडीओ दरम्यान तो पत्नी जया भारद्वाजसोबत डांस करताना पाहायला मिळत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून अनेक चाहत्यांनी यावर लाईक आणि कमेंटचा पाऊसच पडला आहे. दीपकने गेल्या वर्षी आयपीएलदरम्यान जया भारद्वाजला प्रपोज करले होते.

यापूर्वी दोघांनी एकमेकांना अनेक दिवस डेट केले होते. दीपक चहरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या लग्नाच्या संगीत सोहळ्याचा एक व्हिडीओ शेयर केला आहे. ज्यामध्ये दीपक आणि जया डांस करताना दिसत आहेत.

अक्षय कुमारच्या मिस्टर और मिसेस खिलाडी आणि कभी खुशी कभी गम चित्रपटातील बोले चुडिया गाण्यावर ते डांस करताना दिसत आहेत. २९ वर्षीय दीपकने व्हिडीओ शेयर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, क्रिकेट मॅचपेक्षा जास्त दबाव होता. दीपक सध्या आपल्या दुखापतीमधून सावरत आहे.

दीपकच्या पाठीला दुखापत झाली होती त्यामुळे तो २०२२ च्या आयपीएलमध्ये खेळू शकला नाही. त्याला चेन्नई सुपर किंग्सने १४ करोडमध्ये आपल्या ताफ्यात सामील केले होते. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स ९ क्रमांकावर राहिला होता. यादरम्यान रविद्र जडेजाकडे कर्णधारपदाची धुरा होती. पण पहिल्या आठ सामन्यांमध्ये पराभव झाल्यामुळे त्यान आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीने कर्णधार पद भूषवले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepak Chahar (@deepak_chahar9)

ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० विश्वचषक खेळवला जाणार असून दीपक चहर त्यासाठी कसून सराव करत आहे. त्याचे दुखापतीतून सावरणे भारतीय संघासाठी खूपच महत्वाचे आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये चेन्नईला त्याची उणीव चांगली भासली होती.

Leave a Comment