चाणक्य एक महान राजकारणी आणि विचारवंत होते, ते सामन्य जीवनावर जास्त विश्वास ठेवत होते. त्यांच्या महानतेचा अंदाज याच गोष्टीवरुन लावला जाऊ शकतो कि चंद्रगुप्त साम्राज्याचे सर्वात मोठे मंत्री होते. तरीही ते आपल्या सामान्य झोपडीमध्ये राहत होते. आचार्य चाणक्यने आपल्या आयुष्यामध्ये प्राप्त केलेल्या ज्ञान आणि अनुभवाच्या आधारावर चाणक्य नीतिचे नाव ठेवले. चाणक्य नीति मध्ये मानवाच्या जीवनावर आधारित काही अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्या गोष्टींचे अनुसरण एखादा सामान्य व्यक्ती जर करत असेल तर त्याचे जीवन सफल होऊ शकते. तो आपल्या समस्या सहजतेने दूर करू शकतो.

मनुष्याच्या जीवन आणि मरणाबद्दल बऱ्याच वेगवेळ्या गोष्टी बोलल्या जातात. सर्वांना हे चांगले माहित आहे कि ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू अटळ आहे. ज्योतिष्यानुसार पाहायला गेले तर व्यक्ती आपल्या मृत्यूची वेळ माहित करून घेऊ शकतो, परंतु ते एवढे सोपे नाही. परंतु आचार्य चाणक्यने काही अशा गोष्टीचे वर्णन केले आहे ज्या मनुष्याला मृत्यूकडे अग्रेसर करतात, चला तर मग पाहूयात त्या कोणत्या गोष्टी आहेत.जो स्वत: ची काळजी घेत नाही :- आचार्य चाणक्य ने सांगितले आहे कि जी व्यक्ती स्वतःची काळजी घेत नाही. स्वच्छतेशी त्याचा काडीमात्रहि संबंध नसतो किंवा त्याला स्वतःची काळजी असते. असे लोक इतर लोकांच्या तुलनेने लवकर मृत्यूला प्राप्त होतात.

जो गुरूचा द्वेष करतो :- जो व्यक्ती आपल्या गुरूचा द्वेष करतो, अशा व्यक्तीचा लवकर मृत्यू होतो. आपल्या प्राचीन शास्त्र आणि पुराणात, गुरुला भगवंताचा दर्जा देण्यात आला आहे. अशामध्ये गुरूचा द्वेष करने भगवंताला निराश करण्यासारखे आहे. गुरूचा द्वेष मानसिक असंतुलनाचे कारणदेखील बनतो.जो मोठ्यांचा तिरस्कार करतो :- असा व्यक्ती जो मोठ्यांचा किंवा वृद्धांचा तिरस्कार करतो, त्याच्यावर देवाची कृपा कमी होऊ लागते आणि हळू हळू त्याच्या मृत्यूची वेळही जवळ येते. चाणक्य यांच्या मते, वृद्ध लोकांचा द्वेष केल्यामुळे मानसिक आणि शारीरिक नुकसान होते

जो पंडितांचा दुर्व्यवहार करतो :- कधीही कोणत्याही महात्मा किंवा पंडितांचा अपमान करू नये. असे करणे म्हणजे आपल्या मृत्यूला स्वयं आमंत्रण देण्यासारखे आहे. कारण अशा व्यवहाराने व्यक्तीचा मृत्यू जवळ येऊ लागतो आणि महात्माचा शाप देखील लागतो.