Beautiful News Anchor In India बहुतेकवेळा असे पाहायला मिळते कि एखादी मुलगी खूपच सुंदर असेल तर ती मॉडेलिंग आणि अँक्टींग क्षेत्रामध्ये आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करतात. परंतु काही मुली अशा आहेत ज्या अतिशय सुंदर असून देखील या सर्व गोष्टी सोडून वेगळ्या फिल्डमध्ये करियर करतात. याचे ताजे उदाहरण म्हणजे पॉलिटिशियन नुसरत जहाँ. आज आम्ही तुम्हाला देशातील टीव्ही चॅनेल्सच्या काही अँकरंबद्दल News Anchor सांगणार आहोत, ज्या सौंदर्याच्या बाबतीत मोठ मोठ्या अभिनेत्रींना टक्कर देतात.
रुबिका लियाकत :- रुबिका लियाकत जी न्यूजवर न्यूज रिपोर्टिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. रुबिका आपल्या दमदार प्रश्नांनी समोरच्याला घाम आणून सोडते. रुबिकाचा जन्म १८ एप्रिलला उदयपुर, राजस्थान येथे झाला होता. तिने मुंबई युनिव्हर्सिटी येथून बँचलर मास मिडिया (जर्नालीजम) मध्ये पदवी प्राप्त केली आहे.श्वेता सिंह :- श्वेता सिंग ही भारतातील सर्वात प्रसिद्ध न्यूज अँकर आहे. ती आज एका चॅनेलची अँकर आणि एग्जीक्यूटिव एडिटरसुद्धा आहे. कपिल शर्माच्या शोमध्ये देखील ती आपल्याला पाहायला मिळाली होती. श्वेता सिंहचा जन्म २१ ऑगस्ट १९७७ मध्ये पटना येथे झाला होता. आता ती ४२ वर्षांची आहे.अंजना ओम कश्यप :- अंजना ओम कश्यप भारतातील टॉप १० न्यूज अँकरमधील एक आहे. अंजना आज तक या न्यूज चॅनेलवर एग्जीक्यूटिव एडिटरसुद्धा आहे. तिचा जन्म १२ जून १९७५ मध्ये रांची झारखंड येथे झाला होता. तिने २००२ मध्ये जामिया मिलिया इस्लामिया कॉलेज दिल्ली येथून जर्नालीजमचा डिप्लोमा केला आहे. २००३ मध्ये दूरदर्शनवरुन तिने आपल्या करियरची सुरवात केली होती.मिनी मेनन :- मिनी लाइव हिस्ट्री इंडियाची सहसंस्थापक आणि इडिटर आहे. ती मुळची जम्मू येथील असून तिने पुणे युनिव्हर्सिटी येथून मास्टर ऑफ कम्युनिकेशन रिसर्चची डिग्री प्राप्त केली आहे.निधि राजदान :- निधी राजदान २४*७ या चॅनेलवर न्यूज रिपोर्टिंग करताना पाहायला मिळते. ती मुळची दिल्लीची असून तिचा जन्म ११ एप्रिल १९७७ मध्ये झाला होता आता ती ४२ वर्षांची आहे. तिने लेडी श्रीराम कॉलेज फॉर वूमन येथून डिग्री प्राप्त केली आहे. त्याचबरोबर रेडीओ आणि टीव्ही पत्रकारितेमध्ये तिने डिप्लोमा केला आहे.सोनिया शिनॉय :- सोनिया शिनॉय एक सुंदर न्यूज अँकर आहे. ती सीएनबीसी-टीव्ही १८ वर आपल्याला न्यूज रिपोर्टिंग करताना पाहायला मिळते.शेफाली बग्गा :- आजतक ची न्यूज अँकर शेफाली बग्गा सध्या खूप चर्चेमध्ये असते. शेफाली बिग बॉसमध्येसुद्धा आपल्याला पाहायला मिळाली आहे. तिचे प्राथमिक शिक्षण प्रीतमपुरा दिल्ली येथील सचदेवा पब्लिक स्कूल मधून झाले आहे. तर तिचे पुढचे शिक्षण दिल्ली युनिव्हर्सिटी येथून झाले आहे.