लहानपणी असा दिसत होता अभिनेता Riteish Deshmukh, १० वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर केले होते जेनेलियासोबत लग्न !

By Viraltm Team

Published on:

Riteish Deshmukh Childhood Photos बॉलीवूड स्टार रितेश देशमुख याने चित्रपटामध्ये आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर खूपच प्रसिद्धी मिळवली. इतकेच नाही तर रितेश आणि जेनेलिया दोघेही इंडस्ट्रीचे लविंग कपल म्हणूनसुद्धा ओळखले जातात. सध्या त्यांचा एक व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तुझे मेरी कसम या चित्रपटाला १७ वर्षे पूर्ण झाल्यामुळे त्यांनी हा व्हिडिओ बनविला आहे.

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हिंदी आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये चांगलाच ओळखला जातो. रितेश हा महाराष्ट्राचे पूर्व सीएम विलासराव देशमुख यांचा मुलगा आहे. रितेशने २००३ मध्ये तुझे मेरी कसम या चित्रपटामधून बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला होता. परंतु त्याला सर्वात जास्त प्रसिद्धी २००४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या मस्ती या चित्रपटामुळे मिळाली.Riteish Deshmukhफिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केल्यानंतर रितेशने जबरदस्त कॉमेडी मालामाल विकली आणि अपना सपना मनी-मनी सारख्या धम्माल चित्रपटांमध्ये काम केले. या चित्रपटांमध्ये रितेशने केलेली कॉमेडी भूमिका लोकांना खूपच आवडली. चित्रपटामध्ये कॉमेडी भूमिकेचे कौतुक झाल्यानंतर रितेशने एकापेक्षा एक अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले.

हिंदी चित्रपटामध्ये सफलता मिळाल्यानंतर रितेशने २०१३ मध्ये मराठी चित्रपट बालक पालक या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून काम केले. एक वर्षानंतर रितेशने मराठी चित्रपट लय भारी मधून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. रितेशचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला होता.रितेशच्या लव लाईफबद्दल बोलायचे झाले तर जेव्हा रितेश तुझे मेरी कमस या चित्रपटाच्या सेटवर काम करत होता तेव्हा त्याची भेट जेनेलिया डिसूजा सोबत झाली. त्याच वेळी जेनेलियाला पाहिल्यानंतर तो तिच्या प्रेमात पडला. त्यानंतर दोघे एकमेकांना डेट करू लागले.Riteish Deshmukh१० वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी ३ फेब्रुवारी २०१२ मध्ये लग्न केले. लग्नाच्या दोन वर्षानंतर त्यांचा मुलगा रियानचा जन्म झाला आणि २०१६ मध्ये या दोघांना दुसरा मुलगा झाला त्याचे नाव आहे राहील. लग्नानंतर जेनेलिया बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीपासून दूर गेली, परंतु रितेश अजूनही फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुपरहिट चित्रपटांच्याद्वारे लोकांची मने जिंकण्यामध्ये यशस्वी होतो आहे.नुकत्याच प्रदर्शित झालेल्या हाउसफुल आणि मरजावां या चित्रपटांमध्ये रितेशने मुख्य भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली होती. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. रितेश लवकरच त्याच्या बागी ३ या आगामी चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये त्याच्याशिवाय टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट ६ मार्चला प्रदर्शित होणार आहे.

Riteish Deshmukh Childhood Photos

अमिताभ बच्चनची हि अभिनेत्री मृत्यूच्या वेळी होती प्रेग्नेंट Soundarya Death, अंतिम संस्कारासाठी मिळाला नव्हता मृतदेह !

Leave a Comment