किरॉन पोलार्डने सहा चेंडूत ठोकले आहेत सहा षटकार, पहा पत्नीसोबतचे त्याचे फोटो…

By Viraltm Team

Published on:

किरॉन पोलार्डचा जन्म १९८७ मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे झाला होता. तो वेस्ट इंडीजचा एक महत्वाचा खेळाडू आहे. पोलार्ड एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे आणि तो उत्तुंग सत्कार मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. आज आपण त्याच्या पत्नीबद्दल जाणून घेणार आहोत.
पोलार्डने वेस्टइंडीज साठी १२३ एकदिवसीय सामने खेळले असून त्याने २७०० पेक्षा जास्त धावा बनवल्या आहेत. यामध्ये त्याची ३ शतके १३ वर्षामध्ये लगावली आहेत. याशिवाय त्याने टी २० मध्ये १५०० पेक्षा जास्त धावा बनवल्या आहेत. याशिवाय त्याने ५५ सामन्यांमध्ये ४२ विकेट देखील घेतल्या आहेत. २०२१ मध्ये त्याने श्रीलंका विरुद्ध ६ चेंडूमध्ये ६ षटकार लावले होते.
पोलार्डला जगभरामध्ये वेगवेगळ्या लीग सामन्यांमध्ये खेळण्यासाठी ओळखला जातो. आयपीएलमध्ये त्याने १३ वर्षे मुंबई कडून खेळली आहेत. त्याने ६१४ लीग सामने खेळले आहेत ज्यामध्ये त्याने ११००० पेक्षा अधिक धावा बनवल्या आहेत आणि ३०० पेक्षा अधिक विकेट घेतले आहेत.
वेस्ट इंडिजच्या किरॉन पोलार्डने जवळपास ७ वर्षे डेटिंग केल्यानंतर २५ ऑगस्ट २०१२ रोजी जेनाशी लग्न केले होते. लग्नापूर्वीच दोघे एका मुलाचे आईवडील बनले होते ज्याचे नाव त्यांनी कॅडेन पोलार्ड ठेवले होते.
त्याची पत्नी एक बिजनेस वूमन आहे, जी त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये स्पोर्ट्स अॅक्सेसरीज ब्रँड, केजे स्पोर्ट्स अँड एक्सेसरीज़ लिमिटेड चालवते. ती जगभरामध्ये प्रत्येक मोठ्या टूर्नामेंटमध्ये पती किरॉन पोलार्डसोबत जाते.

Leave a Comment