आपली रोग प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यास आपण अनेक संसर्गाला बळी पडता आणि आजारी पडत असता. जर आपणही या समस्येमुळे त्रस्त असाल तर या दिवसात उसाचा भरपूर रस प्या. होय, उसाचा रस आरोग्यासाठी एक वरदानापेक्षा काही कमी नाही. चला आज आपण उसाचा रस व त्याचे आरोग्याशी सं-बंधित बरेच आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊया.

उसाच्या रसात प्रथिने, लोह, पोटॅशियम आणि इतर अनेक आवश्यक पौष्टिक पदार्थ आढळतात. यामुळे आपले आरोग्य आणि उर्जा पातळी चांगली राहते. यामुळे व्यक्तीस थकवा जाणवत नाही आणि नेहमी त्याला एनर्जी मिळते.आयुर्वेदानुसार उसाचा रस रेचक आणि अल्कधर्मी गुणधर्म दाखवत असतो ज्यामुळे आतड्याचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते आणि यामुळे पोटात जळजळ होणे आणि बद्धकोष्ठता अशा समस्या दूर होतात.उसाचा रस खनिजांमध्ये देखील समृद्ध मानला जातो. यात पोटॅशियम आणि अनेक खनिजे असतात जे दात किडणे आणि श्वासासं-बंधीची दुर्गंधी दूर करते तसेच ते बॅक्टेरियाविरोधी म्हणून काम करते. एवढेच नव्हे तर ऊस चघळण्याने तोंडात तयार होणारी लाळही चांगली प्रमाणात निर्माण होते. ही लाळ ऊसामध्ये असलेल्या कॅल्शियमसह एकत्रितपणे मिसळून आपले दात आणि हिरड्या मजबूत बनवते.उसाचा रस हा आपल्या शरीरातील अति चरबी काढून टाकण्यासाठी देखील कार्य करते कारण त्यात फायबर मोठ्या प्रमाणात असते. फायबर शरीरात चरबी नियंत्रित करण्यात महत्वाची भूमिका निभावते.शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आपण उसाचा रस घेऊ शकता. उसाचा रस नैसर्गिक अँटिऑक्सिडेंटने समृद्ध असतो आणि संक्रमणाशी लढा देऊन त्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती वाढवतो.

उसामध्ये असलेले पोटॅशियम पाचन तंत्रामध्ये सुधारणा करून आपणास गॅस आणि एसिडिटी सारख्या समस्यांपासून दूर राहण्यास मदत करते.उसाचा रस प्यायल्याने त्वचा उत्तम राहते. यामुळे पिंपल्स, चेहऱ्यावरचे डाग दूर होतात आणि त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत मिळते.उसाचा रस खोकला, दमा, मुत्ररोग आणि किडनीशी संबधित रोगांवरदेखील फायदेशीर आहे. उसाचा रस कावीळ या रोगांवर अत्यंत गुणकारी आहे. कावीळ होऊ नये म्हणून उसाचा रस पिणे फायदेशीर आहे.उसाचा रस हा नैसर्गिक असल्यामुळे लहांनांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वजण पिऊ शकतात. फक्त १-४ वर्षापर्यंतच्या बालकांनी मात्र उसाचा रस थोड्या प्रमाणात घ्यावा.

बाजारात असणारे कृत्रिम थंड पेय शरीराला तात्पुरता थंडावा देतात पण याचे दुष्परिणाम खूप जास्त आहेत. याउलट उसाच्या रसाचे कोणतेही दुष्परिणाम नसतात. उसाचा रस पटकन नाशवंत होत असल्यामुळे तो पिण्याआधी ताजा असणे फार महत्त्वाचे आहे.