Almond Benefits: वजन कमी करण्यासोबतच हृदयासाठीही फायदेशीर आहे बदाम, जाणून घ्या बदाम खाण्याचे फायदे

By Viraltm Team

Updated on:

Almond Benefits बदाम खाण्याचे फायदे

बदाम खाण्याचे फायदे Almond Benefits : आधुनिक जीवनशैलीमुळे सध्या लठ्ठपणाची समस्या खूपच वाढत चालली आहे. दरम्यान संशोधकांनी बदामाच्या सेवनाबाबत एका नवीन संशोधनात दावा केला आहे की, बदामाचे सेवन केवळ वजन कमी करण्यासच मदत करत नाही तर कार्डिओमेटाबॉलिक आरोग्य देखील सुधारते. हे संशोधन ओबेसिटी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. जगभरात 1.9 अब्ज लोक लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत.

काय म्हणते स्टडी Almond Benefits

ऑस्ट्रेलियामध्ये प्रत्येक तीन व्यक्तींपैकी दोन व्यक्ती लठ्ठपणाचे शिकार आहेत. जेव्हा वजन करण्याचा प्रश्न येतो तेव्हा नट्स वाईट श्रेणीमध्ये ठेवले जातात. पण साऊथ आस्ट्रेलिया यूनिवर्सिटीमध्ये नुकत्याच झालेल्या संशोधनामध्ये दावा केला गेला आहे कि बदाम खाण्याचे फायदे खूप आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ साउथ ऑस्ट्रेलियामधील संशोधक डॉ. शराया कार्टर यांनी सांगितले की, वजन नियंत्रण आणि कार्डिओमेटाबॉलिक आरोग्य या दोन्हींसाठी नट किती प्रभावी आहेत हे या अभ्यासात आढळून आले आहे.

बदाम खाण्याचे फायदे (Almond Benefits)

बदाममध्ये प्रोटीन आणि फायबर जास्त प्रमाणात आढळतात. यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील मोठ्या प्रमाणात आढळतात. बदाममध्ये जास्त प्रमाणात फॅट आढळत असल्याने लोक त्याला वजन वाढवणारे समजतात. पण त्यात आढळणारा वसा आरोग्यदायी असतो. हे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी सुधारते आणि सूज कमी करून हृदय निरोगी ठेवते.

Almond Benefits बदाम खाण्याचे फायदे

संशोधन पथकाने सांगितले आहे कि चाचणी दरम्यान आम्ही बदाम (Almond) आणि नट-मुक्त कमी वसा असणाऱ्या आहाराची तुलना केली तेव्हा दोघांच्या मदतीने शरीराचे वजन सुमारे 9.3 टक्क्यांनी कमी करण्यास मदत मिळाली. परंतु बदाम खाण्याचे फायदे हृदयासाठी पोषक असल्याचे आढळले.

बदाम खाण्याचे इतर फायदे Almond Benefits

बदाम ड्राय स्कीन कोमल बनवण्यासाठी खूपच फायदेशीर मानले जाते. प्रोटीनने समृद्ध बदाम मेंदूच्या पेशींची दुरुस्ती करण्यासाठी उपयुक्त ठरतात. बदाममध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. दररोज बदाम खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. बदाम तुमच्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जाते, कारण बदाममध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते.

हे आहेत रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे, Lasun Benefits जाणून व्हाल दंग !

Leave a Comment