सौदी अरेबियाचा छोटा शेखचे निधन, मॉडेलसोबतच्या व्हायरल व्हिडिओमुळे आला होता चर्चेत…

By Viraltm Team

Published on:

अजीज अल अहमद नेहमीच लोकांमध्ये लोकप्रिय राहिला. त्याची लोकप्रियता फक्त सऊदी अरबमध्येच नाही तर त्याची फॅन फॉलोइंग UAE म्हणजेच संयुक्त अरब अमिरातीमध्ये देखील होती. सोशल मीडिया स्टार शेख अजीज अल अहमदचे निधन झाले आहे.

तो २७ वर्षाचा होता. जगामधील सर्वात छोटा शेख म्हणून त्याला ओळखले जात होते. अजीज एक मॉडल सोबत व्हिडीओ व्हायरल झाल्यामुले चर्चेमध्ये आला होता. जगामधील सर्वात छोटा शेख अजीज आलिशान लाईफ जगत होता. तो एका आलिशान घरामध्ये राहत होता आणि लक्झरी कार चालवत होता. तो नेहमी लोकांमध्ये लोकप्रिय राहिला. त्याच्या लोकप्रियता फक्त सऊदी अरब मध्येच नाही तर यूएई म्हणजेच संयुक्त अरब अमीरातमध्ये देखील होती.माहितीनुसार त्याच्या निधनाची बातमी त्याचा मित्र यजान अल असमरने दिली. यजान अल असमरने सांगितले कि १९ जानेवारी रोजी अजीजचे निधन झाले. त्याने म्हंटले होते कि तो त्याच्या चाहत्यांवर खूप प्रेम करत होता. त्याचा जन्म १९९५ मध्ये रियादमध्ये झाला होता. तो टिकटॉकवर खूप फेमस झाला होता. त्याचे ९४ लाख फॉलोअर्स आहेत. याशिवाय युट्युबवर त्याचे ९ लाख पेक्षा जास्त सब्सक्राइबर आहेत.

शेखची एका मॉडलसोबत चांगली मैत्री होती आणि अनेकवेळा तो व्हिडीओमध्ये तिच्यासोबत पाहायला मिळायचा. कार पासून वाळवंटात व्हिडीओ बनवताना तो त्या मॉडलसोबत पाहायला मिळाला. यादरम्यान त्याच्या महागड्या आणि मोठ्या कार्स देखील पाहायला मिळाल्या.

अजीज अल अहमदला अल कजम नावाने देखील ओळखले जात होते. ज्याचा अर्थ अरबीमध्ये बुटका होतो. माहितीनुसार अजीज जन्मापासूनच हार्मोनल डिसऑर्डर आणि जेनेटिक डिजीजने ग्रस्त होता. तो विवाहित होता आणि त्याचा एक मुलगा देखील आहे. अजीज युट्युबवर मजेदार व्हिडीओ अपलोड करत होता जे खूपच पसंद केले जात होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by YAZAN ALASMAR | AZIZ ALASMAR (@yzn47)

Leave a Comment