जगामध्ये माणसाने असे अनेक ब्रिज बनवले आहेत जे पाहताना आश्चर्य वाटते. लाखो लोकांचे अशा ठिकाणी जाण्याचे स्वप्न असते. या ब्रिजचे सौंदर्या पाहताच बनते. काही ब्रिज खूप उंच आहेत तर काही ट्विस्ट करून बनवले गेले आहे. काही ब्रिज नदीवर आहेत तर काही डोंगरावर आहेत. काही ब्रिजवर सुंदर लाईट लावली गेली आहे जे लक्ष वेधून घेतात. देश-विदेशामधील लोक हे ब्रिज पाहण्यासाठी येत असतात. चला तर असेच काही सुंदर ब्रिज आपण पाहूयात.
या ब्रिजचे सौंदर्य रात्रीच्या वेळी पाहण्यासारखे असते. या मनमोहक ब्रिजचे नाव हेलिक्स ब्रिज आहे. हा ब्रिज सिंगापूरमध्ये आहे. हेलिक्स ब्रिज मरीना साऊथला मरीना सेंटरशी जोडण्याचे काम करतो. मोठ्या संखेम्ध्ये पर्यटक हा ब्रिज पाहण्यासाठी येत असतात. सिंगापूरमध्ये हा ब्रिज २०१० मध्ये बनवला गेला होता.
हा ब्रिज भारताचा शेजारी देश चीनमध्ये आहे. या ब्रिजचे नाव रुई ब्रिज आहे. रुई ब्रिज चीनच्या झेजियांगमध्ये आहे. या ब्रिजचा आकार एखाद्या रिबीन सारखा आहे. शेनजियानजू व्हॅलीवर रुई ब्रिजचे निर्माण केले गेले आहे. रुई ब्रिज २०२० मध्ये बनवण्यात आला होता.
या ब्रिजचे नाव कॉन्स्टिट्यूशन ब्रिज आहे. हा ब्रिज इटलीच्या व्हेनिस येथे आहे. २००८ मध्ये या ब्रिजचे निर्माण करण्यात आले होते. सैंटियागो कैलात्रावाने कॉन्स्टिट्यूशन ब्रिजचे डिझाईन केले होते.
द ट्विस्ट ब्रिज नार्वेमध्ये आहे. हा ब्रिज खूपच सुंदर आहे. याचा आकार वळणावळणाचा आहे म्हणच याचे नाव ट्विस्ट ब्रिज आहे. या ब्रिजचे एकून क्षेत्रफळ ११ हजार चौरस मीटर आहे. हा ब्रिज तीन भागांमध्ये विभागला आहे.
या ब्रिजचे नाव शेख जायद ब्रिज आहे. हा ब्रिज यूएईच्या आबू धाबीमध्ये आहे. जाहा हदीदने या ब्रिजचे डिझाईन बनवले होते. माहितीनुसार या ब्रिजचे निर्माण करण्यासाठी ३०० मिलियन डॉलरचा खर्च आला होता. या ब्रिजचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक लांबून येतात.
हा सुंदर ब्रिज अमेरिकेमध्ये आहे. या ब्रिजचे नाव गोल्डन गेट ब्रिज आहे. हा ब्रिज सॅन फ्रान्सिस्को येथे आहे. हा ब्रिज १९३७ मध्ये बांधण्यात आला होता. इर्विन मोरोने गोल्डन गेट ब्रिजची रचना केली होती.
जगातील सर्वात सुंदर ब्रिज, जिथे जाण्याचे प्रत्येकाचा स्वप्न असते, पहा फोटोज…
By Viraltm Team
Published on: