जसा पुरुष स्त्रीशिवाय अपूर्ण असतो तसेच स्त्री देखील पुरुषाशिवाय अपूर्ण असते. जीवनामध्ये स्त्रीला नेहमी पुरुषाची गरज भासते. काही स्त्रिया सामान्य असतात तर काही असामान्य असतात. असामान्य म्हणजे अशा स्त्रिया ज्यांना काहीतरी भूतकाळ असतो.
प्रेमभंग झालेल्या स्त्रिया स्वावलंबी बनतात. अशा स्त्रिया कधीच कोणावर अवलंबून राहत नाहीत. त्या इतरांवर अवलंबून राहण्याच्या कधीच प्रयत्न करत नाहीत. त्यांना नेहमी अशी भीती वाटत राहते कि त्यांचा कोणीतरी गैरफायदा घेईल. पुरुषापेक्षा स्त्रीला जास्त प्रेमाची गरज असते.
जेव्हा एखाद्या स्त्रीला पुरुषाची गरज असते तेव्हा तिच्या मदतीला धावून जा, तिची मदत करा. म्हणजे तिला पुरुषाची गरज नाही असे वाटणार नाही. स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त लवकर कोणत्याही गोष्टीवर विशास ठेऊ लागतात. त्या कौतुक आणि भावनांकडे जास्त आकर्षित होतात.
बहुतांश स्त्रियांना आधाराची जास्त गरज असते. स्त्रिया पुरूषांच्या तुलनेमध्ये जास्त भावनिक असतात. त्या बऱ्याचदा आपल्या भावना पुरुषांपुढे व्यक्त करतात. अशावेळी पुरुषांनी त्यांच्या भावना ओळखून त्यांच्या गरजांची पूर्तता केली पाहिजे. त्यांना विश्वास दिला पाहिजे कि तुम्ही नेहमी त्यांच्यासोबत आहात.
ऑफिसमध्ये एखादी स्त्री तर तुमच्याजवळ आपले मन मोकळे करत असेल तर तिचे म्हणणे ऐकून घ्या. जेव्हा एखादी स्त्री पतीसोबत झालेल्या वादाची चर्चा तुमच्यासोबत करत असते तेव्हा समजून जा कि तुम्ही तिच्यासाठी खास व्यक्ती आहात आणि तिला तुम्ही जास्त गरज आहे. अशावेळी पुरुषांनी स्त्रीला भावनिक आधार देऊन तिचे सांत्वन केले पाहिजे. अशा प्रकारची गरज कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींची देखील असते. अशावेळी त्यांना मित्राची गरज असते जो त्यांना आधार देईल त्यांच्या भावना समजून घेईल.
बऱ्याच स्त्रिया आपल्या पतीसमोर व्यक्त व्हयला घाबरतात. व्यक्त होणाऱ्या स्त्रियांच्या भावना गरजा ओळखणे सोपे असते. पण व्यक्त न होणाऱ्या स्त्रियांच्या गरजा ओळखणे फार अवघड असते. अशावेळी पतीने हे पाहिले पाहिजे कि आपल्या पत्नीचे आपल्यासोबत बोलणे, वागणे कसे आहे. तिला काय हवे आहे विचारा. बऱ्याचदा त्यांना पतीची सोबत हवी असते अशावेळी त्यांना जवळ घेऊन त्यांच्या प्रेम व्यक्त करावे.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.