सध्या लग्नाच्या अगोदर प्री-वेडिंग फोटोशूट करण्याची क्रेज मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्री-वेडिंग फोटो शूटद्वारे लग्नाच्या अगोदरच्या खास क्षणांना कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला जातो. प्री-वेडिंग फोटो शूट साठी लोक लाखो रुपये खर्च करतात जेणेकरून त्यांना आपल्या होणाऱ्या जोडीदारासोबत एक चांगला फोटो मिळू शकेल.
या फोटोंना एकदम खास बनवण्यासाठी फोटोग्राफरकरून खूप प्रयत्न केले जातात. नुकतेच एका कपलने देखील आपले प्री-वेडिंग फोटो शूट केले, पण त्यांच्या या प्री-वेडिंग फोटो शूट दरम्यान असे काही झाले कि ज्याची त्यांना कल्पना देखील नव्हती.
केरळमध्ये राहणाऱ्या एका कपलने आपले प्री-वेडिंग फोटो शूट करण्यासाठी एक बोट ठरवली होती आणि एका नदीमध्ये त्यांनी आपले फोटो शूट केले. फोटो शूट करताना अचानक त्यांची नाव पलटली. ज्यामुळे कपलला नदीमध्ये बुडताना पाहून तिथे असलेले लोक त्यांना वाचवण्यासाठी पुढे आले आणि त्यांना वाचवले. तथापि यादरम्यान या कपलच्या फोटोग्राफरने यांचा खूपच सुंदर फोटो क्लिक केला आणि त्याचबरोबर त्यांची नाव पलटण्याचा एक व्हिडीओ देखील बनवला.
या कपलच्या व्हिडीओमध्ये दोघे एका बोटीमध्ये बसलेले दिसत आहेत आणि फोटो शूट दरम्यान यांच्यावर नदीचे पाणी फेकले जात आहे. जेणेकरून फोटो आणखी रोमांटिक निघावा. पाण्यासाठी वाचण्यासाठी या कपलने केळीची पाने धरली आहेत. कपलद्वारे मिळालेल्या या पोजला त्यांच्या फोटोग्राफर जसे क्लिक केले तसे त्यांची बोट पलटली आणि कपल पाणीमध्ये पडले. या व्हिडीओमध्ये दिसत असलेले कपलचे नाव तिजिन आणि शिल्पा आहे. त्यांची नाव पलटण्याचा व्हिडीओ त्यांच्या फोटोग्राफरने फेसबुकवर अपलोड केला. ज्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला वेडप्लानर वेडिंग स्टूडियोने शेयर केले आहे.
वेडप्लानर वेडिंग स्टूडियो नुसार ज्या बोटीमध्ये तिजिन आणि शिल्पा बसले होते. ती बोट हलवण्याच्या प्लान फोटोग्राफरचा होता. जेणेकरून एक चांगला फोटो क्लिक करता यावा. हि कल्पना रॉय लॉरेंसने दिली होती जो त्यांच्या प्री-वेडिंग फोटो शूटला कव्हर करत होता. इतकेच नाही तर रॉय लॉरेंसने बोट हलवण्याची माहिती तिजिन आणि शिल्पा दिली नव्हती. कारण त्याची इच्छा होती कि एक परफेक्ट घेता यावा. तथापि जसे हा फोटो काढला गेला तसे बोट एकदम पलटली आणि तिजिन आणि शिल्पा नदीमध्ये पडले.
वेडप्लानर वेडिंग स्टूडियोने तिजिन आणि शिल्पाचा या प्री-वेडिंग फोटो शूटचा व्हिडीओ सोमवारी अपलोड केला होता आणि आतापर्यंत या व्हिडीओला ८ लाखापेक्षा जास्त व्हिव आले आहेत. या व्हिडीओला खूप पसंद केले जात आहे आणि यावर अनेक कमेंट्स देखील आल्या आहेत.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.