Chachi 420 या चित्रपटातील हि मुलगी माहिती आहे का? आज आहे बॉलिवूडची एक प्रसिद्ध अभिनेत्री !

By Viraltm Team

Published on:

Fatima Sana Shaikh Chachi 420 : १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या चाची ४२० या चित्रपटामध्ये कमल हासन, तब्बू आणि अमरीश पुरी या दिग्गज कलाकारांनी काम केले होते. या चित्रपटामध्ये एक सुंदर आणि गोड मुलगी भारतीसुद्धा होती, जिच्या भोवतालीच पूर्ण चित्रपटाची स्टोरी फिरते. या बालकलाकाराचे नाव फातिमा सना शेख असे होते. या चित्रपटातील तिच्या भूमिकेमुळे ती खूपच लोकप्रिय झाली.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल कि, ती हीच अभिनेत्री आहे जीने अमीर खानचा चित्रपट दंगलमध्ये गीता फोगाटची भूमिका केली होती. दंगल चित्रपटातील भुमिकेमुळे फातिमाला खूपच लोकप्रियता मिळाली. परंतु खूपच कमी लोकांना हे माहिती आहे कि फातिमा हि तीच अभिनेत्री आहे जिने चाची ४२० (Chachi 420) मध्ये कमल हासनच्या मुलीची भूमिका साकारली होती.Chachi 420काही दिवसांपूर्वी फातिमाने एक मुलाखत दिली होती, ज्यामध्ये तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला. या मुलाखतीदरम्यान तिने सांगितले कि चाची ४२० (Chachi 420) च्या शुटींगवेळी ती खूपच छोटी होती. ज्यामुळे तिला आपल्या पहिल्या चित्रपटाबद्दल काही माहिती नव्हते. तिने सांगितले कि तिला फक्त एवढेच आठवते कि, तिने कमल हासनसोबत एक चांगला काळ व्यतीत केला होता.Fatima Sana Shaikhतिच्या इतर चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर इश्क आणि बडे दिलवाला या चित्रपटामध्येसुद्धा तिने बालकलाकार म्हणून काम केले आहे. ती बिट्टू बॉस आणि वन टू फोर मध्ये सुद्धा दिसली आहे. त्यानंतर तिचा दंगल हा चित्रपट आला होता ज्यामध्ये तिला चांगली पसंती मिळाली. ठग्स ऑफ़ हिन्दोस्तान या चित्रपटामध्ये ती आपल्याला शेवटची पाहायला मिळाली होती. तिच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर २०२० मध्ये ती लुडो आणि सुरज पर मंगल भारी आणि भूत पोलीस या चित्रपटांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे.

Fatima Sana Shaikh Chachi 420

Suhani Bhatnagar: दंगलमधील छोट्या बबिताचे झाले गजब ट्रांसफॉर्मेशन, चाहते म्हणाले; सारा-कियारापेक्षा देखील

Leave a Comment