Dinesh Phadnis Death: CID फेम दिनेश फडणीस यांचे निधन, वयाच्या 57 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By Viraltm Team

Published on:

Dinesh Phadnis

CID actor Dinesh Phadnis Death: सीआईडी मध्ये फ्रेडरिक्सची भूमिका साकारलेले लोकप्रिय अभिनेता दिनेश फडनीस (Dinesh Phadnis) यांचे निधन झाले आहे. शनिवारी रात्री त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते आणि त्यांची प्रकृती नाजूक असल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. 57 वर्षीय अभिनेत्यावर मुंबईतील तुंगा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. सीआयडी अभिनेते दयानंद शेट्टी यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

दयानंद शेट्टी यांची शेयर केली Dinesh Phadnis Death न्यूज

दयानंद शेट्टी यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिनेश फडणीस (Dinesh Phadnis) यांच्या निधनाबद्दल सांगितले कि, दिनेश यांनी रात्री 12.08 वाजता अखेरचा श्वास घेतला. दयानंद शेट्टी यांनी सांगितले कि दिनेश फडणीस यांचे अनेक अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचे निधन झाले. ते पुढे म्हणाले कि, काळ रात्री त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले. अभिनेत्यावर मुंबईत सकाळी 10.30 वाजता अंतिम संस्कार होणार आहेत.

Dinesh Phadnis

हृदयविकाराच्या झटक्याची आली होती बातमी

याआधी दिनेश फडणीस यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त आले होते, त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तथापि दयानंद शेट्टी यांनी नंतर पुष्टी केली कि त्यांना हृदयविकाराचा झटका आला नव्हता तर त्यांचे यकृत निकामी झाले आहे.

Dinesh Phadnis यांच्या यकृतावर झाला होता परिणाम

दयानंद शेट्टी यांनी पुढे सांगितले कि दिनेश एका दुसऱ्या आजारावर उपचार घेत होते, पण औषधाने त्यांच्या यकृतावर विपरीत परिणाम झाला. त्यामुळे नेहमी औषधे काळजीपूर्वक घेण्याचा सल्ला दिला जातो. तुम्हाला माहिती नाही कि जे औषध आपण एखाद्या उपचारामध्ये घेतो ते इतर दुसऱ्या आजाराचे कारण बनू शकते.

CID मधून घराघरात फेमस झाले होते Dinesh Phadnis

दीर्घकाळ चालणाऱ्या सीआयडी शोमध्ये फ्रेडरिकची भूमिका साकारल्यानंतर दिनेश घराघरामध्ये फेमस झाले होते. सीआयडी (CID) शो 1998 मध्ये सोनी टीव्हीवर सर्वात पहिला प्रसारित झाला होता जो 20 वर्षे सुरु होता. तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय टेलिव्हिजन सिरीयलमध्ये देखील त्यांनी भूमिका साकारली होती. सुपर ३० आणि सरफरोश यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी सहाय्यक भूमिका केल्या.

Leave a Comment