मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्याची प्रकृती गंभीर, मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु…

By Viraltm Team

Published on:

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खूपच चिंताजनक आहे. विक्रम गोखले यांच्यावर पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. गेल्या १५ दिवसांपासून ते हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. पण सध्या त्यांची प्रकृती खूपच चिंताजनक आहे.

अभिनेते विक्रम गोखले यांनी नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध क्षेत्रामध्ये काम करून दर्शकांच्या मनावर छाप सोडली आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेते विक्रम गोखले यांनी गोदावरी चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका केली होती. चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत जितेंद्र जोशी, अभिनेत्री गौरी नलावडे, अभिनेता संजय मोन हे देखील मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळाले होते.

त्याचबरोबर त्यांनी तुझेच मी गीत गात आहे या सिरीयलमध्ये देखील पुन्हा एंट्री केली होती. अनेक वर्षे ब्रेक घेतल्यानंतर त्यांनी सिरीयलमध्ये काम केले होते. सिरीयलमध्ये त्यांनी पंडीत मुकुल नारायण यांची भूमिका केली आहे.

अभिनेते विक्रम गोखले यांनी मराठी सोबत हिंदी चित्रपटांमध्ये देखील अनेक महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. ३० ऑक्टोबर रोजी अभिनेते विक्रम गोखले यांनी आपला ८२ वा वाढदिवस साजरा केला आहे.

अकेला, अग्निपध , ईश्वर, हम दिल दे चुके सनम, घर आया मेरा परदेसी अशा हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी महत्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. त्याचबरोबर सुखांनो या, अग्निहोत्र, संजीवनी यासारख्या सुपरहिट सिरियल्समधील त्यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. नटसम्राट, माहेरची साडी, लपंडाव, वजीर सारख्या चित्रपटांमध्ये देखील ते पाहायला मिळाले.

Leave a Comment