महाराष्ट्राला ‘वेड’ लावण्यात रितेश-जेनेलिया यशस्वी, तीन दिवसांत चित्रपटाने कमावला तब्बल इतक्या ‘करोडचा’ गल्ला…

By Viraltm Team

Published on:

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांचा वेड चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. सध्या या चित्रपटाने दर्शकांचा चांगलेच वेड लावले आहे. चित्रपटाला दर्शकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे.

वेड चित्रपटामध्ये रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत. चित्रपट रितेश देशमुखने स्वतः दिग्दर्शित केला आहे. तर जेनेलियाने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शिवाय जेनेलियाचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. चित्रपटाच्या रिलीज अगोदरच चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती.

चित्रपटामधील गाणी देखील दर्शकांना आवडली आहेत. शुक्रवारी ३० डिसेंबर रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. ज्यानंतर चित्रपट पाहण्यासाठी दर्शकांची चांगलीच गर्दी जमली होती. आता या चित्रपटाच्या कमाईचे तिसऱ्या दिवसाचे आकडे समोर आले आहेत.

ट्रेड अॅ.नालिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईचे आकडे नुकतेच शेयर केले आहेत. त्यानुसार चित्रपटाने पहिल्या दिवशी २.२५ करोडची कमाई केली. दुसऱ्या दिवशी हा आकडा ३.२५ करोडवर गेला आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने तब्बल ४.५० करोडची कमाई केली. तीन दिवसांमध्ये चित्रपटाने १० करोडचा आकडा पार केला आहे.

वेड चित्रपटाने सध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नवीन चैतन्य निर्माण केले आहे. येत्या दोन दिवसांमध्ये चित्रपटाचा आकडा आणखी मोठा होईल अशी आशा जाणकार व्यक्त करत आहेत. क्रिकेट खेळामध्ये पटाईत असलेल्या सत्य आणि त्याच्या सच्च्या प्रेमाची गोष्ट वेद चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे.

शेखरअन्ना नावच गुंड सत्याला त्रास देतो, तो का आणि कसा हे चित्रपट पाहिल्यानंतरच समजेल. तर सत्याचे श्रावणीसोबत लग्न होते, लग्नाला सात वर्षे होऊन देखील दोघांमध्ये अबोला असतो, सत्य दारूच्या आहारी गेलेला असतो, रेल्वेमध्ये काम करणारी श्रावणी त्याचा खर्च भागवत असते, असं असूनही सत्या आणि श्रावणीमध्ये दुरावा का याची उत्तरं 12 वर्षांपूर्वीच्या फ्लॅशबॅकमध्ये मिळतात, जी थिएटरमध्ये पहायला मजा येईल.

Leave a Comment