रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुजा यांचा वेद चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ गल्ला जमवला आहे. चित्रपटामध्ये रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुजा यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटामध्ये दोघांनी चांगलीच मेहनत घेतली आहे.
सध्या सर्वच स्तरामधून कलाकारांचे खूपच कौतुक होत आहे. बॉलीवूड चित्रपट सर्कस आणि अवतार २ सारख्या चित्रपटांना टक्कर देखील चित्रपटाने चांगले प्रदर्शन केले आहे. चित्रपटामधील सर्व कलाकरांच्या अभिनयाचे सध्या कौतुक होत आहे. चित्रपटामध्ये एक बालकलाकार देखील पाहायला मिळाली आहे. तिने देखील आपल्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अभिनेत्रीने आपल्या अभिनयातून दर्शकांच्या मनावर चांगली छाप सोडली आहे. सध्या तिचा चाहता वर्ग वाढताना पाहायला मिळत आहे.
अनेकांना हा प्रश्न पडला असेल कि हि बालकलाकर कोण आहे. तर या चिमुकलीचे नाव ख़ुशी हजारे असे आहे. वेड चित्रपटात मीरा ही व्यक्तिरेखा प्रसिद्ध बालकलाकार खुशी हजारे हिने साकारली आहे. ख़ुशीने अनेक हिंदी मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती वजनदार, प्रवास, सरबजीत, भूत, आपडी थापडी सारख्या चित्रपटांमध्ये अभिनय करताना दिसली आहे.
ख़ुशीने अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे ज्यामध्ये विकी कौशल, ऐश्वर्या राय, श्रेयस तळपदे, अशोक सराफ, पद्मिनी कोल्हापूरे, सई ताम्हणकर अशा दिग्गज कलाकारांची नावे सामील आहेत. रितेशचा वेड चित्रपट सध्या चांगले प्रदर्शन करताना पाहायला मिळत आहे. ख़ुशीने २०२० मध्ये प्रवास चित्रपटामधून मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते.
चित्रपटाने आतापर्यंत जवळ जवळ १४ करोडच्या आसपास कमाई केली आहे. रितेश देशमुखने या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रामध्ये पाऊल ठेवले आहे. चित्रपटाच्या यशानंतर आता अशी आशा व्यक्ती केली जात आहे कि मराठी चित्रपटांना आता चांगले दिवस येतील.
View this post on Instagram