‘वेड’ चित्रपटाने मोडले सर्व रेकॉर्ड, ठरला सर्वाधिक कमी करणारा दुसरा चित्रपट, पहा तब्बल ‘इतक्या’ कोटींची केली कमाई…

By Viraltm Team

Published on:

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्या वेड चित्रपटाने अख्या महाराष्ट्राला वेड लावले आहे. चित्रपट रिलीज झाल्यापासून फक्त याच चित्रपटाची चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाला दर्शकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे.

चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सैराट नंतर वेड चित्रपट सर्वाधिक कमी करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. वेड चित्रपटाने रिलीजच्या काही दिवसांमध्ये अनेक रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. एकाच दिवशी सर्वाधिक कमाई करण्याच्या सैराट चित्रपटाचा रेकॉर्ड वेड चित्रपटाने मोडीत काढला आहे.

त्याचबरोबर रितेशच्या लय भारी चित्रपटाचा रेकॉर्ड देखील वेड चित्रपटाने मोडला आहे. आता या चित्रपटाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटां यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्शच्या माहितीनुसार वेड हा सर्वात जास्त कमाई कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे.

या यादीमध्ये पहिला चित्रपट सैराट आहे. वेड चित्रपटाने शुक्रवारी १.३५ कोटींची कमाई केली, तर शनिवारी २.७२ कोटींची कमाई केली. रविवारी हा चित्रपट आणखीन जास्त कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण ४४.९२ करोडचा गल्ला जमवला आहे. लवकर हा चित्रपट ५० करोडचा आकडा देखील पार करेल असा अंदाज लावला जात आहे. या चित्रपटामधून अभिनेता रितेश देशमुखने दिग्दर्शन क्षेत्रामध्ये प्रवेश केला आहे.

त्याचबरोबर रितेशची पत्नी जेनेलियाने मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला आहे. चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय, संवाद, गाणी हि दर्शकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहेत. त्यामुळे हा चित्रपट लवकरच ५० करोडचा आकडा पार करेल यामध्ये काहीच शंका नाही

Leave a Comment