‘वेड’ चित्रपटाची रेकॉर्डब्रेक कमाई पाहून रितेश देशमुख झाला भावूक; पोस्ट शेयर करत म्हणाला…

By Viraltm Team

Published on:

नवीन वर्षाच्या सुरुवातीसोबत चित्रपट प्रेमींना अनेक चित्रपटाची उत्सुकता आहे. ज्यांचा बॉक्स ऑफिसवर अवतार २ आणि दृश्यम २ सारखा धुमाकूळ असला पाहिजे. तथापि अजूनपर्यंत २०२३ मध्ये कोणताही हिंदी चित्रपट रिलीज झालेला नाही, पण हिंदी चित्रपटातील अभिनेता रितेश देशमुखचा डायरेक्टोरियल डेब्यू मराठी चित्रपट वेड सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट रिलीज होऊन दहा दिवस झाले आहेत आणि इतक्या कमी दिवसांमध्ये या चित्रपटाने मोठमोठ्या चित्रपटांना टक्कर द्यायला सुरुवात केली आहे.

हा रोमांटिक ड्रामा आहे, जो रितेशने दिग्दर्शित आणि जेनेलियाने प्रोड्यूस केला आहे. लग्नानंतर रितेश आणि जेनेलियाने पहिल्यांदाच एकत्र चित्रपटामध्ये काम केले आहे. चित्रपटामध्ये अशोक सराफ, जिया शंकर आणि राहुल देव देखील भूमिकेमध्ये आहेत. ३० डिसेंबर रोजी रिलीज झालेला हा चित्रपट दर्शकांना खूपच पसंद येत आहे.

ओपनिंग वीकेंडवर चित्रपटाने १० करोडचे कलेक्शन केले होते. पहिल्या शुक्रवारी वेडने २.२५ करोड, शनिवारी एक जानेवारी ३.३५ करोड आणि रविवारी दोन जानेवारी ४.५० करोडची कमाई केली होती. सध्या हा चित्रपट सिंगल डेमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. चित्रपटामध्ये सलमान खानने देखील उपस्थिती लावली आहे.

वेड चित्रपटाचे बाजत १५ करोड रुपये आहे. इतक्या कमी बजटच्या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच आठवड्यामध्ये एकूण खर्चाच्या आसपास कमाई केली आहे. चित्रपटाने राहिलेली कसर दुसऱ्या आठवड्यामध्ये पूर्ण केली आहे. फिल्म क्रिटिक आणि ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शने सांगितले कि दुसऱ्या आठवड्यामध्ये चित्रपटाने पहिल्या वीकेंडपेक्षा २७.५० टक्के कमाई केली आहे. दुसरा शनिवार आणि रविवारला चित्रपटाची चांगली ग्रोथ झाली. शुक्रवारी चित्रपटाने २.५२ करोड, शनिवारी ४.५३ करोड आणि रविवारी ५.७० करोडचे कलेक्शन केले. आता एकूण आकडा ३३.४२ करोड इतका झाला आहे.

दरम्यान वेड चित्रपटाला मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतासादामुळे अभिनेता रितेश देशमुख भारावून गेला आहे. रितेश देशमुखने सोशल मिडिया अकाऊंटवरून एक खास पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टद्वारे त्याने दर्शकांचे आभार मानले आहेत. पोस्ट शेयर करत त्याने लिहिले आहे कि, प्रेक्षकांचे कोटी कोटी आभार… वेड चित्रपटाला आपलं प्रेम आणि आशिर्वाद असाच लाभू द्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

Leave a Comment