टीव्हीवरील नागीण म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री उर्वशी ढोलकियाचे लाखो चाहते आहेत. अभिनेत्री जेव्हा कोमोलिका बनून पडद्यावर आली होती तेव्हा तिने मुख्य भूमिकेमध्ये असलेल्या सर्व कलाकारांना मागे टाकत जास्त प्रसिद्धी मिळवली. उर्वशीने आपल्या कलेने लोकांच्या हृदयामध्ये जागा निर्माण केली आहे, पण खऱ्या आयुष्यामध्ये ती अजून देखील खऱ्या प्रेमाच्या प्रतीक्षेत आहे.
उर्वशी भलेही आज टीव्ही जगतामधील प्रसिद्ध चेहरा आहे पण खऱ्या आयुष्यामध्ये तिची स्टोरी खूपच रंजक आहे. तुम्हाला जाणून हैराणी होईल कि उर्वशीने फक्त १६ व्या वर्षी लग्न केले होते आणि लग्नाच्या एक वर्षानंतर ती दोन मुलांची आई बनली होती.
लग्नाला दोन वर्षेपण झाली नाहीत कि अभिनेत्री पतीपासून वेगळी झाली होती. सिंगल मदर असलेल्या उर्वशीने आपल्या करियरवर संपूर्ण फोकस करायला सुरुवात केली. एकटे राहणे सोपे आहे पण दोन मुलांची जबाबदारी सांभाळणे थोडे अवघड होते. उर्वशीला एक वेळ अशी आली होती कि तिच्याजवळ मुलांची फीस भरण्यासाठी देखील पैसे नव्हते. तिने ३ हजार रुपयांसाठी पायलट एपिसोड शूट केला होता पण तिला फक्त १५०० रुपयेच मिळाले होते.
उर्वशीने अजून देखील आपल्या पतीची ओळख लोकांना सांगितलेली नाही. लग्न मोडल्यानंतर उर्वशीच्या आयुष्यामध्ये अनुज सचदेवाची एंट्री झाली होती. नंतर ७ वर्षानंतर दोघांचे ब्रेकअप झाले होते. असे मानले जाते कि अनुज सचदेवचे आईवडील या नात्यावर खुश नव्हते. ज्यानंतर अनुज सचदेवा आणि उर्वशी ढोलकियाने वेगवेगळा मार्ग निवडला.
उर्वशी ढोलकियाने आपल्या टीव्ही करियरमध्ये एकापेक्षा एक उत्कृष्ट रोल केले पण सर्वात जास्त चर्चेमध्ये ती तेव्हा राहिली जेव्हा तिने कसौटी जिंदगी कि सिरीयलमध्ये कोमोलिकाची भूमिका केली होती. हि सिरियल आठ वर्षे सुरु होती आणि यामध्ये कोमोलिकाच्या भूमिकेला इतर मुख्य भूमिकांपेक्षा जास्त पसंद केले होते.
View this post on Instagram
उर्वशीच्या अभिनय करियरबद्दल बोलायचे झाले तर तिने वयाच्या ६ व्या वर्षापासून जाहिरातींमध्ये काम करायला सुरुवात केली होती. यानंतर तिने श्रीकांत सिरीयलमधून आपल्या टीव्ही करियरची सुरुवात केली होती. पण तिला खरी ओळख २००१ मध्ये आलेल्या कसौटी जिंदगी कि सिरीयलमुळेच मिळाली. या सिरीयलशिवाय तिने देख भाई देख, घर एक मंदिर, कभी सौतन कभी सहेली, कहीं तो होगा, घर एक मंदिर, कहानी तेरी मेरी, बेताब दिल की तमन्ना है, बड़ी दूर से आए हैं सारख्या टीव्ही सिरियल्समध्ये देखील काम केले.