Upcoming IPO: खात्यामध्ये पैसे ठेऊन तयार राहा, डिसेंबरमध्ये येणार आहेत या कंपन्यांचे IPO

By Viraltm Team

Published on:

Upcoming IPO

Upcoming IPO: गेल्या महिन्यामध्ये टाटा टेक, गांधार ऑईल, IREDA च्या बंपर लिस्टिंगनंतर आता या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये (Upcoming IPO in December) काही कंपन्या इनिशियल पब्लिक ऑफर (IPO) घेऊन येणार आहेत. यामध्ये डोम्स इंडस्ट्रीज सारख्या कंपनी देखील नाव आहे.

Upcoming IPO

डिसेंबर Upcoming IPO लिस्ट

एक्सेंट माइक्रोसेल लिमिटेड (Accent Microcell Limited): एक्सेंट माइक्रोसेलचा IPO 8 डिसेंबर 2023 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 12 डिसेंबर 2023 रोजी बंद होईल. कंपनीचा हा IPO 78.40 करोड रुपयांचा आहे. हा IPO 56 लाख शेअर्सचा फ्रेश इश्यू आहे. या IPO ची प्राईस बँड 133 रुपये ते 140 रुपये प्रति शेअर आहे. कंपनीने 1000 शेयरचा लॉट ठेवला आहे. त्यानुसार या IPO मध्ये किमान 140,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

डोम्स इंडस्ट्रीज लिमिटेड (DOMS Industries Limited): स्टेशनरी आणि आर्ट प्रोडक्ट बनवणाऱ्या डोम्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा IPO १३ डिसेंबर रोजी उघडणार आहे. कंपनीचा हा IPO 15 डिसेंबरला बंद होणार आहे. या IPO ची किंमत 1,200 करोड रुपये आहे. या IPO मध्ये फ्रेश इश्यू 350 करोड रुपये आहे आणि ऑफर फॉर सेल 850 करोड आहे. तथापि कंपनीचा IPO प्राइस बँड अजून जाहीर झालेला नाही.

मुथूट माइक्रोफिन लिमिटेड (Muthoot Microfin Limited): हा IPO एकूण 1,350 करोड रुपयांचा आहे. 950 करोड रुपयांचा फ्रेश इश्यू आणि 400 करोड रुपयांचा ऑफर सेल आहे. कंपनीने अद्याप IPO डेट जाहीर केलेली नाही.

इतर कंपन्यांचे IPO: एसजे लॉजिस्टिक्सचा IPO हा पूर्णपणे फ्रेश इश्यू आहे ज्यामध्ये 38.4 लाख शेयर सामील आहेत. तथापि अजून या कंपनीची डेट देखील फिक्स नाही आहे. शिवाय आईनॉक्ससीवीए, ज्योति सीएनसी ऑटोमेशन, इंडिया शेल्टर देखील आपला IPO लॉन्च करणार आहेत पण IPO ची तारीख अजून जाहीर केलेली नाही.

Sheetal Universal IPO: 4 डिसेंबरला खुलणार शीतल यूनिवर्सलचा आयपीओ, GMP देऊ लागला प्रॉफिटचे संकेत

Leave a Comment