लाईफमधील पहिला कीस खूपच खास असतो. एखाद्याला कीस करणे हे दर्शवते कि तुम्ही त्याच्यावर किती प्रेम करता. तथापि किसिंगची खरी मजा तेव्हा येते जेव्हा तो योग्य प्रकारे केला जातो. पण काही लोक आपल्या पार्टनरला कीस करताना काही चुका करून बसतात. त्यांची हि चूक कीसचा अनुभव खराब करून टाकते.
असे नाही कि फक्त पहिला कीस करताना लोक चूक करतात. अनेक अनुभवी आणि अनेक कीस केलेले लोक देखील किसिंगदरम्यान चुका करतात. अशामध्ये आज आपण अशा चुका जाणून घेणार आहोत ज्या किसिंग करताना चुकून देखील करू नयेत. जर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचा किसिंग आणि त्याचा अनुभव खुच चांगला होईल.
किसिंगवेळी सर्वात वाईट गोष्ट असते तोंडातून दुर्गंधी येणे. यामुळे तुमच्या पार्टनरचा मूड खराब होतो. यामुळे तुम्ही जेव्हा कधी किसिंगचा प्लान करता तेव्हा हे सुनिश्चित करा कि तुमच्या तोंडातून दुर्गंधी येत नाही. यासाठी तुम्ही माऊथ फ्रेशनर, सुगंधी टूथपेस्ट यासारख्या गोष्टी वापरू शकता. तुमच्या तोंडातून चांगला सुगंध येत असेल तर पार्टनर देखील जोशाने भरून जाईल. नंतर तुमचा कीस देखील खूप वेळ चालेल.
जर तुम्हाला तोंड येण्याची समस्या असेल तर तुम्हाला कीस करण्यापासून लांब राहिले पाहिजे. तुमच्या कीसमुले समोरच्या व्यक्तीच्या तोंडामध्ये इंफेक्शन होऊ शकते. अशामध्ये तुमचा पार्टनर तुम्हाला कीस करण्यापूर्वी दहावेळा विचार करेल. यामुळे त्यांचा तुमच्यावरील विश्वास देखील कमी होईल.
कीसची खरी मजा तेव्हा येते जेव्हा यामध्ये होणारे फिजिकल टच शिवाय इमोशनल कनेक्शन देखल होईल. जर दोघांपैकी एकाचा देखील कीस करण्याचा मूड नसेल तर यापासून दूर राहिले पाहिजे. इच्छा नसताना जबरदस्ती केलेला कीस खूपच बकवास असतो. यामुळे पार्टनरसोबतचे नाते देखील बिघडून जाते.
एकमेकांना कीस करताना देखील अनेकवेळा व्यक्ती भान हरपून जातो. नंतर तो खूपच जास्त जवळ येऊ लागतो. आपल्या मर्यादा विसरून जातो. हि गोष्ट कडची तुमच्या पार्टनरला आवडू शकणार नाही. खासकरून तेव्हा जेव्हा तुम्ही याआधी कधीच शारीरिक संबंध बनवले नसतील. अशा स्थितीमध्ये समोरच्या व्यक्तीच्या मर्जीशिवाय पुढे जाऊ नये.
कोणतीही गोष्ट पुन्हा पुन्हा त्याच अंदाजामध्ये केली तर व्यक्ती बोर होतो. कीसचा देखील असाच सीन आहे. तुमच्या कीसमध्ये नेहमी वेगळेपणा आणला पाहिजे. याला बोरिंग होऊ देऊ नका. प्रत्येकवेळी वेगळ्या अंदाजामध्ये कीस करा. यामध्ये थोडा रोमांस आणि प्रेमळ गोष्टी देखील जोडा. पण पहा तुमचा कीस किती रंजक होईल.