दोन जुळ्या बहिणींसोबत लग्न करणाऱ्या तरुणावर कारवाई होणं अशक्य, कायद्यातून अशी मिळणार पळवाट…

By Viraltm Team

Published on:

सध्या एकाचा मांडावामध्ये दोन जुळ्या बहिणींसोबत तरुणाने केलेले लग्न खूपच चर्चेमध्ये आहे. सध्या या दाम्पत्यावर अनेक महिला प्रतिनिधींकडून कारवाई करण्याची मागणी येऊ लागली आहे. अशामध्ये अतुल अवताडे याने मुंबईच्या दोन जुळ्या बहिणी रिंकी आणि पिंकी पाडगावकर यांच्यासोबत लग्न केल्यानंतर आता पोलिसांनी यावर अदखलपात्र नोंद घेतली आहे.

पण यानंतर अनेक समाजामधून महिला वर्ग आक्रमत झाल्यामुळे आता पोलिसांपुढे पेच देखील निर्माण झाला आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहिता १८६० च्या ४९४ कलमानुसार तक्रार दाखल करून घेतली आहे. पण हि तक्रार फक्त त्रास होत असलेल्या पिडीत व्यक्तीलाच दाखल करता येते.

हिंदू विवाह कायद्यामध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे यामधून पळवाट काढणं शक्य आहे असा दावा आता कायदेतज्ञ करत आहेत. हिंदी विवाह कायद्यामध्ये दुरुस्ती गरजेची असल्याचे म्हणत अशा विवाहाची कल्पना कायदे मंडळाला नसल्याने या प्रवधानाचा फायदा या दाम्पत्याला मिळू शकणार असल्याचे विधिज्ञ धनंजय रानडे सांगतात. अशामुळे समाजामध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो ज्यामुळे हिंदू विवाह पद्धती मोडकळीस येऊ शकतो असे देखील ते म्हणाले.

या लग्नाच्या विरोधात अनेक पक्षाच्या महिला परस्पर विरोधी भूमिका घेताना पाहायला मिळत आहेत. यासाठी कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याच गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. मनसेच्या संगीता ताड यांनी अशा समाजविघातक कृत्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे.

एकीकडे या लग्नाबद्दल तीव्र प्रतिसाद उमटत असताना विवाहामध्ये उपस्थित असणारे वऱ्हाडी , हॉटेल मालक , तक्रारदार आणि अगदी पोलीस देखील माध्यमांना टाळण्याचे काम करत आहेत. अशा विवाहाला मान्यता मिळाल्यास भविष्यात अनेक तरून अशा पद्धतीने समाजाची चौकट मोडणारी कृत्य करतील. त्यामुळे शासनाने आणि न्याय व्यवस्थेने हिंदू विवाह पद्धतीमधील त्रुटी दूर न केल्यास समाज व्यवस्था बिघडण्याचे संकट आ वासून उभे राहील.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment